Biodiversity Awards Goa: गोव्यात मंगळवारी विविध मान्यवरांना जैवविविधता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात दोन ज्येष्ठ व्यक्ती आणि त्यांचे कार्य प्रकर्षाने सर्वांच्या समोर आले. त्या व्यक्ती म्हणजे 74 वर्षीय बाळकृष्ण अय्या आणि दुसऱ्या 80 वर्षीय रुक्मिणी पांडुरंग नाईक. दोघांच्याही कार्याचे आणि त्याप्रती त्यांच्या समर्पणाचे कौतुक केले जात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 74 वर्षीय बाळकृष्ण अय्या हे लोलये काणकोण येथील रहिवाशी असून, त्यांनी एकट्यांनी पाण्यासाठी विहीर खोदली आहे. तर, 80 वर्षीय रुक्मिणी नाईक सर्पदंशापासून अनेकांचे प्राण वाचवण्याचे काम करतात.
बाळकृष्ण हे एक कलाकार असून, त्यांनी कला शिक्षक म्हणून काम केले आहे. पण, मागील 10 ते 12 वर्षापासून 20 ते 25 लोक राहत असलेल्या त्याच्या वस्तीत पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याने त्यांनी स्वत:च आपल्या लोकांसाठी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला.
बाळकृष्ण यांनी स्वतःच्या बचतीतून पायरीच्या विहिरीचे काम सुरू केले. खोदल्यानंतर सुमारे 40 मीटर खोलवर त्यांना पाणी लागले. दरम्यान, बाळकृष्ण यांच्या सातत्याचे आणि या वयातील जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एवढेच नव्हे तर बाळकृष्ण यांनी विहिरीवर एक पंप बसवून पाणी नसलेल्या इतर घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाइपलाइन देखील केली. पाण्यामुळे हैराण झालेल्या लोकांना बाळकृष्ण यांचे कृत्य सर्वांसाठी आशादायी आणि प्रेरणादायी ठरत आहे.
तसेच, बाळकृष्ण यांच्याप्रमाणे रुक्मिणी या देखील सर्पदंश झालेल्यांना मोफत उपचार सुविधा पुरवतात. रुक्मिणी यांचे वयाच्या 19 व्या वर्षी सावई-वेरे येथून बागवाडा, खांडोळा येथे लग्न झाले. त्यांचे सासरे वृद्ध हे पारंपारिक वैद्य असल्याची त्यांना समजले. दरम्यान, त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर तो वारसा त्यांनी सुरू ठेवला आहे. रुक्मिणी यांचे पती शेतकरी असल्याने त्यांना देखील औषधी वनस्पती यांची माहिती असल्याचे त्या सांगतात.
80 वर्षीय रुक्मिणी नाईक सर्पदंश, सर्व प्रकारचे त्वचारोग, जखमा यावर मोफत उपाचार देतात. दरम्यान, वयामुळे त्यांना आता रूग्णांच्या घरी जाता येत नाही. पण, त्यांनी हा वारसा तीन मुलांकडे सोपवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.