Goa Crime: 73 गुंडांच्या तडीपारीची शिफारस; प्रत्यक्षात फक्त चार जणांवरच कारवाई का ?

सध्याच्या स्थितीत फक्त पाच प्रकरणांची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर चालू आहे तर चार जणांना तडीपार केले आहे.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

Goa Crime: नामचीन गुंडांच्या तडीपारीची शिफारस जिल्ह्यातील गुंडगिरी आटोक्यात आणण्यासाठी की फक्त नावापुरतीच, असा प्रश्र्न दक्षिण गोव्यातील गेल्या सहा वर्षांच्या शिफारसींचा आढावा घेतल्यानंतर कुणालाही पडू शकतो.

याचे कारण म्हणजे, गेल्या सहा वर्षांत तब्बल 73 गुंडांच्या तडीपारीची शिफारस करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात चार जणांनाच तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या सहा वर्षांत ज्या 73 शिफारसी करण्यात आल्या त्यातील 32 शिफारसी जिल्हाधिकारी कार्यालयाने फेटाळल्या असून अन्य 32 प्रकरणे सबळ पुराव्याअभावी कोलमडली. सध्याच्या स्थितीत फक्त पाच प्रकरणांची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर चालू आहे तर चार जणांना तडीपार केले आहे.

मागच्या सहा वर्षांची आकडेवारी पाहता 2018 साली सर्वात जास्त म्हणजे 28 शिफारसी करण्यात आल्या होत्या तर सर्वात कमी म्हणजे फक्त 1 शिफारस 2017 मध्ये करण्यात आली होती. मागच्या 2022 मध्ये अशा आठ शिफारसी केल्या आहेत.

2019 मध्ये आठ, 2020 मध्ये 17 तर 2021 मध्ये 11 शिफारसी करण्यात आल्या होत्या. 2018 मध्ये सार्वजनिक शांतता बिघडविण्याच्या आरोपाखाली 24 जणांना तर रासुकाखाली 4 जणांच्या विरोधात कारवाईची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

Goa Crime
Goa News: जुन्या बसस्थानकावर घाणीचे साम्राज्य

सार्वजनिक शांतता कुठलीही व्यक्ती बिघडवू शकते, असे वाटल्यावरच तडीपार करण्याची शिफारस करतात. मागच्या सहा वर्षांत केलेल्या 73 शिफारसींपैकी फक्त चारप्रकरणी करवाई केली असेल तर पोलिस योग्य त्या गंभीरतेने या प्रकरणांचा पाठपुरावा करत नाहीत हे सिद्ध होते.

काही प्रकरणांत राजकीय दबावातूनही पोलिस अशा शिफारसी करतात; पण नंतर ते पुरावे सादर करू शकत नाहीत. - ॲड. संजित देसाई, मडगाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com