G-20 Summit 2023 in Goa : महिला सशक्तीकरणाची जागतिक पातळीवर गरज : नायडू

‘जी-20’च्या तिसऱ्या बैठकीसाठी सज्जता
G-20 Summit 2023 in Goa
G-20 Summit 2023 in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

G-20 Summit 2023 in Goa : जी-20 शिखर बैठकांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील नेत्यांना एकत्र आणून महत्त्वाच्या जागतिक मुद्यांवर चर्चा केली जात आहे. आजपासून (ता. 9) 11 मेपर्यंत विकासात्मक कार्यगटाची तिसरी बैठक दोनापावला येथील ताज रिसॉर्ट ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होईल.

या बैठकीस जी-20 देशांचे 71 विदेशी प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बहुतांश प्रतिनिधी राज्यात दाखल झाले असून बैठकीसाठी गोवा सज्ज झाला आहे.

या तिसऱ्या बैठकीत डिजिटल तत्त्वे, हरित संक्रमणे, आंतरराष्ट्रीय समन्वय आणि भागीदारी वाढवणे यासह शाश्वत विकासाशी संबंधित जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हे प्रतिनिधी संवाद साधणार आहेत.

बैठकीतील प्रमुख विषयांमध्ये शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) संबंधीच्या प्रगतीला चालना देण्यासाठी ‘जी-20’ची भूमिका या विषयाचाही समावेश असेल.

G-20 Summit 2023 in Goa
Sanquelim-Ponda Municipal Council Election 2023: साखळीत रश्‍मी, तर फोंड्यात रितेश शक्य; शर्यत नगराध्यक्षपदाची

शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) साध्य करण्यासाठी आपल्या विकासात्मक कामांना कशाप्रकारे चालना देण्याची गरज आहे, याबाबत तिसरा विकासात्मक कार्यगट विचार करत आहे.

पर्यावरणप्रीय जीवनशैलीविषयक काही उच्च आचरण तत्त्वांसह काही धाडसी, कृतिशील उपाययोजना आखण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

तसेच या संक्रमणांना कशा प्रकारे गती देता येईल यावरही बैठकीत ऊहापोह केला जाईल. जग डिजीटल क्रांतीच्या मध्यावर आहे आणि त्यामुळे काही जागतिक पर्यावरणीय उद्दिष्टे व्यापक करण्याबाबतही विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे.

खऱ्या अर्थाने लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरण साधायचे असेल, तर महिलांप्रणीत विकास धोरण अंगीकारण्याची गरज आहे,’ अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव के. नागराज नायडू यांनी दिली.

गोव्यातील जी-20 बैठकांसाठीचे नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्ज म्हणाले, या बैठकांसाठी व्यापक तयारी केली जाते आणि नियोजनाबाबतच्या सर्व प्रक्रिया आधीच निश्चित केल्या जातात.

प्रतिनिधींना स्थानिक अनुभव देण्याच्या दृष्टीने, प्रत्येकवेळी नवीन कल्पना तयार केल्या जातात आणि त्यावर काम केले जाते.

G-20 Summit 2023 in Goa
Ponda News : दुसऱ्या मजल्यावरून तो उडी मारणारच होता, पोलिसांनी लढवली ही शक्कल अन्...

विमानतळांवर विशेष स्वागत कक्ष

गोव्यातील दोन्ही विमानतळांवर प्रतिनिधींच्या स्वागतासाठी विशेष स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी व त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संपर्क अधिकारी आणि स्वयंसेवक प्रतिनिधीही तैनात ठेवण्यात आले आहेत.

हॉटेलपासून विविध ठिकाणी या प्रतिनिधींना जाण्यासाठीचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. समूहगटामध्ये येणाऱ्या प्रतिनिधींच्या प्रवासासाठी इलेक्ट्रिक बसगाड्या उपलब्ध केल्या आहेत. तर उच्चपदस्थ, महनीय प्रतिनिधींसाठी लक्झरी कार सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

कडक बंदोबस्त

या बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कडक सुरक्षा उपाययोजना हाती घेण्यात आली असून काटेकोर तपासणी केली जात आहे. बैठक तसेच विविध कार्यक्रमांच्या स्थळावर सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणवेश आणि नागरी पोशाखातील पोलिस व सुरक्षारक्षक चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com