Parra Temple Theft Case: राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाच एक नवीन बातमी समोर आली आहे. पर्रा येथील लिंगभाट देवस्थानच्या मंदिरातील फंडपेटी फोडून चोरट्यांनी सुमारे 70 हजार रुपये लंपास केले आहेत.
या प्रकरणात तिघांचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.
माहितीनुसार, पर्रा येथील लिंगभाट देवस्थानच्या मंदिरात मध्यरात्री तिघा चोरट्यांनी मागील बाजूच्या खिडकीचे ग्रील कापून आतमध्ये प्रवेश केला. त्यांनी तिथेच असलेली फंडपेटी फोडून त्यातील रोख रक्कम 70 हजार पळवले.
हे तीनही चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. तिघांनीही रेनकोट घातला असून आपले तोंड मास्कने झाकले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटणे कठीण आहे.
दरम्यान, लिंगभाट देवस्थानचे अध्यक्ष रमाकांत नाईक यांनी सांगितले की, याआधीही मंदिरात अशीच घटना घडली होती; मात्र त्यावेळी कोणतीही वस्तू चोरीस गेली नव्हती. पण यावेळेस फंडपेटीतील पूर्ण रक्कमच चोरट्यांनी पळवली आहे.
सदर घटनेबाबत आमदार मायकल लोबो यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, अशा घटना अतिशय दुख:द आहेत, कारण या महादेवाच्या मंदिरात दुसऱ्यांदा चोरी झाली. इथे वर्षानुवर्षे बार्देश आणि परिसरातील सर्वजण दर्शनासाठी येत असतात.
यावरून मला वाटतं की परिसरात रात्रीची गस्त वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. हा मुद्दा आम्ही विधानसभेतही मांडला आहे. याआधी पोलिसांना गस्त घालण्यासाठी मोटरसायकल देण्यात आल्या होत्या, त्यावेळी ते प्रत्येक मंदिर-चर्चकडे फेरी मारून गस्त घालत, मात्र सध्या ते बंद झाले आहे.
याबाबत मी आज विधानसभेत हा मुद्दा मांडणार आहे. पूर्ण राज्यातील मंदिरे, चॅपल आणि चर्च सुरक्षित असणे गरजेचे आहे, त्यासाठी पोलीस फौज आणि गस्त वाढवणे हाच एक उपाय आहे. यापुढे अशा घटना घडतानाच चोरांना पकडले पाहिजे. गस्त वाढली तर आपोआप चोरीच्या घटना कमी होतील, असा माझा विश्वास आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.