Goa Assembly: ३३ सत्ताधाऱ्यांसमोर ७ विरोधक ‘भारी’

Goa Assembly Monsoon Session 2024: युरींसह विजय, वेन्‍झी यांनी पाडली छाप; प्रश्‍‍नांची अभ्‍यासपूर्ण मांडणी
Goa Assembly Monsoon Session 2024: युरींसह विजय, वेन्‍झी यांनी पाडली छाप;  प्रश्‍‍नांची अभ्‍यासपूर्ण मांडणी
Goa Assembly Monsoon Session 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ४० सदस्यीय विधानसभेत विरोधी गटात केवळ ७ आमदार. तरीही ते पुरून उरले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रत्येक विषय अभ्यासून कसा मांडता येतो हे दाखवून दिले. यामुळे विरोधकांची संख्या किती हा मुद्दा यापुढे गौण ठरेल यावर काल (ता.७) संपलेल्या विधानसभा अधिवेशनात शिक्कामोर्तब झाले.

युरी आलेमाव यांचे अनेक प्रश्न कामकाजात समाविष्ट केले गेले नव्हते. तो विषय त्यांनी शेवटपर्यंत लावून धरला. अखेर विधिमंडळ खात्याकडून संबंधित खात्याकडे प्रश्नच पाठवला गेला नव्हता हे युरी यांनी सिद्ध केले.

‘आपल्या प्रश्नांची उत्तरे सरकार देणार नसेल तर विधानसभेत मी यायलाच कशाला हवे’, असे उद्विग्न उद्गगारही या विरोधी पक्षनेत्याने काढले.

एका बाजूला फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई आणि दुसरीकडे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यांच्या साथीने युरी यांनी विरोधी पक्षाची छाप विधानसभा अधिवेशनावर पाडली होती.

विरोधकांना बोलण्‍याची अधिक संधी मिळाली

प्रश्नोत्तराच्या तासाला ठरवून पुरवणी प्रश्न विचारून विरोधी आमदार मंत्र्यांना खिळवून ठेवत. त्यानंतर शून्य तास, लक्षवेधी सूचनेद्वारेही सरकारला विविध समस्यांची दखल घेण्यास भाग पाडत होते. सभागृहाचे कामकाज निवांतपणे सुरू आहे, असे कधी त्यांनी होऊ दिले नाही. सातत्याने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत जनतेच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही आहोत, असा संदेश विरोधी आमदार देत राहिले. अधिवेशनाच्या सायंकाळच्या सत्रात कपात सूचना-मागण्या त्यांना पाठिंबा व ठराव या सत्रात विरोधकांनी आपली भूमिका प्रखरपणे मांडली. तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी चाललेल्या या अधिवेशनात विरोधकांना यावेळी बोलण्याची अधिक संधी मिळाली.

१.आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांच्‍यापासून कपात सूचना-मागणी पाठिंबा व विरोध या सत्राची सुरुवात झाल्याचे दिसून आले. वकील असल्याने अत्यंत मुद्देसूद व त्यांनी दिलेली उदाहरणे आणि आकडेवारी याची दखल सरकारला निश्‍चित घ्यावी लागेल. काहीवेळा सरकारकडून झालेल्या चुकाही त्यांनी नजरेस आणून दिल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी केलेल्या सूचनाही सरकारला स्वीकाराव्या लागल्या आहेत.

२.आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी आपल्या केपे मतदारसंघातील अनेक विषयांना वाचा फोडली. मतदारसंघातील मासळी मार्केटचा मुद्दा असो की पहिल्या मजल्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय असो, त्यांनी तो तडफेने मांडला. मतदारसंघातील लहान लहान समस्या असो, भूमिगत वीज वाहिनींचे काही पंचायत क्षेत्रांत राहिलेल्या कामाविषयी त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

३.‘रिव्‍हॉल्युशनरी गोवन्स’चे आमदार वीरेश बोरकर यांनी सांतआंद्रे मतदारसंघातील प्रश्‍न हिरीरीने मांडल्याचे दिसून आले. त्याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे नावशी येथील मरिना प्रकल्प गरजेचा का नाही, हे त्यांनी सभागृहात आक्रमकपणे मांडले.

Goa Assembly Monsoon Session 2024: युरींसह विजय, वेन्‍झी यांनी पाडली छाप;  प्रश्‍‍नांची अभ्‍यासपूर्ण मांडणी
Goa Cabinet: राज्य मंत्रिमंडळ फेरबदल तूर्तास नाही; पक्षश्रेष्ठींचा आदेश

४.‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी आकडेवारीचा आधार घेत आणि मागील २०२३-२४ व २०२४-२५ च्या अर्थसंकल्पातील आर्थिक तरतुदीतील तफावतीवर बोट ठेवल्याचे दिसून आले. प्रत्येक खात्यातील आर्थिक तफावतीतून किंवा कमी झालेल्या तरतुदीतून सरकारला काय साध्य करायचे आहे, हे त्यांनी सर्वांसमोर आणले. सरकारच्या योजनांचा वाजलेला बोजवारा किंवा सरकारच्या धोरणांमुळे येथील जनतेला त्याचा फायदा की तोटा हे दाखवण्याचा त्यांचा सदोदित प्रयत्न राहिला.

५.आम आदमी पक्षाच्या दोन्ही आमदारांपैकी वेन्‍झी आक्रमक दिसून आले. राज्यातील किनाऱ्यापासून सह्याद्रीच्या घाटापर्यंतच्या समस्या त्‍यांनी मांडल्‍या. राज्यात अनेक ठिकाणी उभारले जात असलेले प्रकल्प किती मारक आहेत? त्याशिवाय खारीवाडा किनारा, एमपीटीकडून अपेक्षा, बाणावली मतदारसंघात अनेक ठिकाणी साचत असलेल्या पाण्याचा होणारा परिणाम आदी विषय सभागृहासमोर पोटतिडकीने मांडले.

६.आमदार क्रूझ सिल्वा यांनी अधिवेशनात मतदारसंघाच्या अनुषंगाने सूचना मांडल्या. त्याशिवाय सर्वांत महत्त्वाची बाब म्‍हणजे त्यांनी वीज अभियंते आमदाराशी व्यवस्थित वागत नसल्याचे सांगत सभागृहाचे लक्ष वेधले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com