वास्को: सहकार चळवळ राष्ट्रीय पातळीवरून प्रत्येक राज्यात पोहचली असल्याने, भविष्यात सहकार क्षेत्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सहकारी क्षेत्रात ई बँकींग सुविधा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. तसेच सहकारी संस्थांमध्ये माहिती तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी म्हटले आहे.
(69th National Cooperative Week celebrated in Goa )
यावेळी बोलताना आमदार कृष्णा साळकर म्हणाले की, सहकार शब्द आज देशात प्रगती पथावर आहे. केंद्र सरकारने गंभीरतेने सहकार क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला असून यात महत्वाचा वाटा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आहे.
आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले की, सहकारी संस्थेच्या सहकार्याने माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीला घडविला. मला सर्वप्रथम व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहकार्य केले ते एका सहकारी पंत संस्थेने. गोव्यातील विकासात सहकारी पत संस्था भविष्यात महत्वाचा घटक असणार असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते मोहन डिचोलकर म्हणाले की, सहकार पत संस्थेचा मालक हा भागधारक असतो व त्यात महत्वाची भूमिका बजावत असतात संस्थेचे कार्यकारीणी सदस्य. भागधारकांच्या विश्वासाने पत संस्था विकसीत होते. केंद्र सरकारने सहकार क्षेत्रात येऊन क्रांती निर्माण केली असल्याची माहिती डिचोलकर यांनी दिली.
69 वा राष्ट्रीय सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो सन्मानीय पाहुणे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिगीस, प्रमुख वक्ते मोहन डिचोलकर, दि गोवा राज्य सहकारी बॅकेचे चेअरमन उल्हास फळदेसाय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.