दिवाळीच्या तोंडावर गोव्यात 108 ला रस्ते अपघातांशी संबंधित 65 कॉल; सरासरीपेक्षा 30 टक्के वाढ

शनिवार आणि रविवारी झालेल्या अपघातांपैकी 90 टक्के अपघात दुचाकी वाहनांचे होते.
108 ambulance
108 ambulance
Published on
Updated on

दिवाळीच्या तोंडावर गोव्यातील आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा ‘108’ ला रस्ते अपघातांशी संबंधित 65 कॉल प्राप्त झाले. कॉलची संख्या दैनंदिन सरासरीपेक्षा 30 टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती मंगळवारी एजन्सीने दिली.

शनिवार आणि रविवारी झालेल्या अपघातांपैकी 90 टक्के अपघात दुचाकी वाहनांचे होते, अशी माहिती राज्य सरकार संचालित रुग्णवाहिका सेवेच्या प्रवक्त्याने दिली आहे.

वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या पुतळ्याचे दहन करण्याची प्रदीर्घ परंपरा गोव्यात आहे.

शनिवारी आणि रविवारी रस्ते अपघातांशी संबंधित 65 फोन कॉल्स आले, जे प्रमाण दररोजच्या सरासरीपेक्षा 30 टक्क्यांनी जास्त आहे, असे ईएमआरआय ग्रीन सर्व्हिसेसच्या पुढाकाराने चालवल्या जाणार्‍या रुग्णवाहिका सेवेच्या प्रवक्त्याने सांगितले.

आठवड्याच्या शेवटी एकूण 1,191 आपत्कालीन फोन कॉल आले. आरोग्यासह विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी शनिवारी 528 आणि रविवारी 663 फोन कॉल्स आल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com