गोवा मुक्तीनंतर प्रथमच उजळला 'हा' रस्ता! इतकी वर्षे होते अंधाराचे साम्राज्य

Vante Morpirla: चार किमी रस्त्यावरअसलेले पथदीप ५४ लाख रुपये खर्च करून बसविण्यात आले आहेत
Vante Morpirla: चार किमी रस्त्यावरअसलेले पथदीप ५४ लाख रुपये खर्च करून बसविण्यात आले आहेत
Street Light|Street lampCanva
Published on
Updated on

केपे: वंटे ते मोरपिर्ला दरम्यानच्या रस्त्यावर बसवण्यात आलेल्या पथदीपांचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. गोवा मुक्तीनंतर ६२ वर्षांनी प्रथमच हा रस्ता विजेच्या प्रकाशात उजळला आहे.

मोरपिर्ला येथे आयोजित या कार्यक्रमाला सरपंच अश्विनी वेळीप, उपसरपंच प्रकाश वेळीप, पंच सदस्य नागेश वेळीप, नीतेश वेळीप, संगीता गावकर, बार्सेचे पंच दत्ता व समीर वेळीप आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार डिकॉस्ता म्हणाले की, केपे मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास आहे. त्यानुसार मी लोकहितासाठी कार्य करीत आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांना मूलभूत सुविधांसाठी सतत त्रास सहन करावे लागले असून त्यामुळे प्रत्येक विधानसभेच्या कामकाजावेळी माझ्या मतदारसंघातील समस्या विधानसभेत मांडण्यात भर दिला.

वंटे ते मोरपिर्लापर्यंत पथदीप बसविण्यात यावे, यासाठी विधानसभेच्या निवडणुकीवेळी मी लोकांना आश्वासन दिले होते. मी दिलेले वचन पूर्ण केले असून यासाठी वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस व वीज खात्यातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.यावेळी मोरपिलांचे उपसरपंच प्रकाश वेळीप म्हणाले की, जी गोष्ट यापूर्वी कोणी केली नव्हती, ती प्रत्यक्षात करून दाखवल्याबद्दल आमदार डिकॉस्ता यांचे मोरपिर्लावासीय सदैव ऋणी राहतील. आमदार डिकॉस्ता यांनी केपेच्या हितासाठी काम केले आहे. त्यांची विकासकामे रोखण्यासाठी काहीजण प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आपण आमदारांना पाठिंबा दिला पाहिजे, असे ते म्हणाले.

Vante Morpirla: चार किमी रस्त्यावरअसलेले पथदीप ५४ लाख रुपये खर्च करून बसविण्यात आले आहेत
Ponda Roads: पावसामुळे फोंड्यातील रस्ते खराब! चतुर्थीनंतर करावा लागणार पुन्हा श्रीगणेशा

७.६० कोटी खर्चून रस्ता रुंदीकरण

वंटे ते मोरपिर्ला हे सुमारे चार कि.मी. अंतरावर असलेले पथदीप ५४ लाख रुपये खर्च करून बसविण्यात आले आहेत. यापुढे सात कोटी साठ लाख रुपये खर्चून वंटे ते मोरपिर्ला रस्ता रुंदीकरण करण्यात येईल, तसेच नेटवर्कचा विषय अवघ्या दोन महिन्‍यांनंतर सुटेल असे डिकॉस्ता यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com