Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर 60 वर्षीय रशियन पर्यटकाच्या सामानात सापडले GPS उपकरण; गुन्हा दाखल

अधिकाऱ्यानी प्रवाशाच्या ताब्यातून उपकरण जप्त केले.
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Airport: दाबोळी विमानतळावर रशियन पर्यटकाच्या सामानात GPS उपकरण आढळले आहे. पोलिसांनी याप्रकरणी 60 वर्षीय रशियन प्रवाशा विरोधात गुन्हा नोंद केला आहे. शनिवारी (दि.09) हा प्रकार उघडकीस आला.

डेनिस पोटापेव्ह असे या 60 वर्षीय रशियन प्रवाशाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटापेव्ह गोव्याहून कोत्सोस्वो येथे जाणाऱ्या एरोफ्लॉट रशियन एअरलाईनमध्ये बसणार होते.

पोटापेव्ह विरोधात भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा 1933 च्या कलम 6 (1A) आणि भारतीय टेलिग्राफ कायदा 1885 च्या कलम 20 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

परवानगी नसलेले उपकरण घेऊन प्रवास करण्यास मनाई असल्याने अधिकाऱ्यानी प्रवाशाच्या ताब्यातून उपकरण जप्त केले.

पोलीस निरीक्षक अमरनाथ पासी यांच्या देखरेखीखाली व मुरगावचे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दाबोळी विमानतळ हेडकॉन्स्टेबल साईश आजगावकर पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com