53rd IFFI First Day : असा होता 'IFFI' चा पहिला दिवस! कलाकारांच्या हजेरीने इफ्फीला चार चांद

53rd IFFI Opening Ceremony : आजपासून 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI) गोव्यात सुरुवात झाली.
53rd IFFI Opening Ceremony
53rd IFFI Opening CeremonyDainik Gomantak
Published on
Updated on

53rd IFFI First Day : आजपासून 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI) गोव्यात सुरुवात झाली. यंदाच्या IFFI मध्ये 79 देशांमधून एकूण 280 चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत पहिल्या चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले. ‘अल्मा अँड ऑस्कर’ या ऑस्ट्रेलियन चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. (53rd IFFI Opening Ceremony)

53rd IFFI Opening Ceremony
IFFI Goa 2022: 53 व्या इफ्फीचे थाटात उद्घाटन; सौरांना जीवनगौरव तर चिरंजीवी 'Personality of The Year'

चित्रपटाचे दिग्दर्शक डायटर बर्नर म्हणाले की, ‘हा चित्रपट एकोणिसाव्या शतकातील ऑस्ट्रियन कवी, नाटककार आणि शिक्षक, ऑस्कर कोकोस्का आणि अल्मा यांच्यावर आधारित आहे. हा चित्रपट त्यांच्या प्रेमकथेवर आधारित असून तो नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटाशी जोडून ठेवतो.

अल्मा अँड ऑस्कर चित्रपटाची संपूर्ण टीम याप्रसंगी उपस्थित असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

53rd IFFI Opening Ceremony
53rd IFFI Opening CeremonyKavya Powar

संध्याकाळी डॉ. श्यामाप्रसाद इनडोअर स्टेडियम मध्ये IFFI च्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्टेडियम बाहेरील Red Carpet वर बॉलीवूडसह जगभरातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली.

2022 च्या IFFI मध्ये फ्रान्स आकर्षणाचा केंद्रबिंदू असून अनेक फ्रान्स चित्रपट पुढील 8 दिवसात दाखवण्यात येणार आहेत. यावेळी फ्रान्सचे राजदूत Emmanuel Lenain यांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, बॉलीवूडप्रमाणेच फ्रान्समधील चित्रपटसृष्टीही भव्य आहे. यंदा फ्रान्समधील अनेक चित्रपट IFFI मध्ये दाखवले जाणार आहेत आणि याचा मला आनंद आहे. IFFI हे कलाकारांसाठी जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ आहे.

Dr. Shyama Prasad Mukherjee Indoor Stadium for IFFI Inauguration
Dr. Shyama Prasad Mukherjee Indoor Stadium for IFFI Inauguration Dainik Gomantak

बॉलीवूडमधील अनेक कलाकार जसे की परेश रावल, मनोज वाजपेयी, अजय देवगण, सुनील शेट्टी, वरुण धवन, सारा अली खान, कार्तिक आर्यन, अमृता खानविलकरसह अनेकांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली.  त्यानंतर डॉ. श्यामाप्रसाद इनडोअर स्टेडियममध्ये राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली. अभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्या श्री गणेश वंदनाने उपस्थितांना मोहून टाकले.

Mrural Thakur Performance
Mrural Thakur Performance Dainik Gomantak

स्पॅनिश फिल्ममेकर कार्लोस सौरा यांना सत्यजित 'रे जीवनगौरव पुरस्कार' यांना प्रदान करण्यात आला. 93 वर्षांचे कार्लोस सध्या ब्राँकायटिसने त्रस्त असल्याने त्यांची मुलगी ॲना सौरा हीने पुरस्कार स्वीकारला.

त्याचबरोबर मेगास्टार चिरंजीवी यांना ''Indian Film personality of the year 2022'' पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवाय परेश रावल, सुनील शेट्टी, अजय देवगण आणि मनोज वाजपेयी यांनादेखील उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले.

Spanish Director Carlos Saura daughter receiving Satyajit Ray Lifetime Achievement Award on his behalf.
Spanish Director Carlos Saura daughter receiving Satyajit Ray Lifetime Achievement Award on his behalf.Dainik Gomantak

यावेळी उपस्थित असलेले केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर म्हणाले, ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) जगभरातील चित्रपट दिग्दर्शकांना त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ बनले आहे. मला खात्री आहे, भारत सह-निर्मिती, पोस्ट-प्रॉडक्शन, चित्रपट शूटिंग आणि तंत्रज्ञान भागीदारांसाठी एक उत्कृष्ट केंद्र बनेल’

Central Minister Anurag Thakur at IFFI inauguration
Central Minister Anurag Thakur at IFFI inauguration Dainik Gomantak

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्घाटनावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी चित्रपट निर्माते आणि गुंतवणूकदारांना राज्यात चित्रपटाशी संबंधित पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पुढे येऊन गोव्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले, ज्यासाठी सरकार आवश्यक ती मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

'मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील नामांकित चित्रपट व्यक्तिमत्त्व मास्टरक्लासला संबोधित करतील. यावर्षी एक विशेष गोवा विभाग देखील तयार करण्यात आला आहे. भारतीय पॅनोरामाच्या तीन सदस्यांचा समावेश असलेल्या आणि गोवा विभागासाठी तयार केलेल्या ज्युरी पॅनेलने गोव्याचे 6 लघुपट आणि एक डॉक्युमेंटरी फिल्म निवडले आहेत', असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, चित्रपट संस्कृती राज्यात आपली मुळे मजबूत करत आहे आणि गोव्यातील काही तरुणांनी चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म या दोन्ही उद्योगात आपली उपस्थिती दर्शवण्यास सुरुवात केली आहे.

उद्घाटन कार्यक्रमात विविध कलाकारांचे नृत्य सादरीकरण प्रेक्षकांसाठी मेजवानीच बनले. उद्यापासून गोव्यात महोत्सवातील उर्वरित चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

CM Pramod Sawant at IFFI inauguration
CM Pramod Sawant at IFFI inauguration Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com