Goa Marriages: राज्यात सासष्टी तालुक्यात सर्वाधिक 528 विवाह रद्द; सर्वाधिक विवाहनोंदणीदेखील सासष्टीतच

गेल्या पाच वर्षातील आकडेवारी; विधानसभेतील उत्तरातून समोर आली माहिती
Goa Marriages Nullified:
Goa Marriages Nullified: Dainik Gomantak

Goa Assembly session on Goa Marriages: गोव्यातील सासष्टी तालुक्यात राज्यात सर्वाधिक विवाह रद्द करण्यात आल्याचे समोर आले आहे.

गेल्या पाच वर्षातील आकडेवारीनुसार तालुक्यात एकूण 528 विवाह रद्द करण्यात आले आहेत.

आम आदमी पक्षाचे (आप) आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी विधानसभेत गोव्यात नोंदणी केलेल्या तालुकानिहाय विवाहांची माहिती विचारली होती.

गोव्यात रद्द झालेल्या विवाहांची संख्या आणि गोव्यात येऊन विवाह केलेल्या गोव्या बाहेरील असलेल्यांच्या नोंदणीकृत विवाहांची संख्याही त्यांनी विचारली होती. त्यावर विधी व न्यायमंत्री निलेश काब्राल यांनी ही माहिती दिली.

Goa Marriages Nullified:
Goa Petrol Diesel Price: पणजी, उत्तर गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांत घट; दक्षिण गोव्यातील किंमतींमध्ये वाढ

सासष्टीमध्ये पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल 9,342 विवाहांची नोंदणी झाली आहे. गोव्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. त्यापैकी 528 विवाह रद्द करण्यात आले.

मंत्र्यांच्या उत्तरानुसार, गोव्यात एकूण 44,346 विवाहांची नोंदणी 12 तालुक्यांतील सब रजिस्ट्रार कम सिव्हिल रजिस्ट्रारकडे झाली आहे आणि एकूण 1,265 विवाह विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले आहेत.

राज्यात सर्वाधिक विवाह नोंदणीत बार्देश तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे ७,२४० विवाह झाले. बार्देशमध्ये रद्द झालेल्या विवाहांची संख्या 43 इतकी कमी आहे.

Goa Marriages Nullified:
संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्यावर गुन्हा का नोंद केला नाही? माजी आमदार आलेमाव यांचा सवाल

मुरगाव तालुका विवाह रद्दच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. 204 विवाह येथे रद्द झालेत. दरम्यान, तालुक्यात नोंदणीकृत विवाहांची संख्या 3,839 इतकी कमी आहे.

विशेष म्हणजे, विवाहाची नोंदणी करताना अर्जदाराने त्याची जात किंवा धर्म नमूद करण्याची कायद्यात तरतूद नाही, असे मंत्री म्हणाले.

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचा उल्लेख करण्यासाठी विवाह नोंदणी नमुन्यात कोणताही कॉलम नाही, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com