Private Bus Operators: प्रलंबित अनुदान द्या अन्यथा आंदोलन करू! ५०० नवीन बसेसबाबतही खासगी बसमालकांच्यात नाराजी

All Goa Private Bus Owner Association: सरकार गोमंतकीयांचा व्यवसाय संपविण्याच्या दिशेने काम करत आहे असा आरोप
All Goa Private Bus Owner Association: सरकार गोमंतकीयांचा व्यवसाय संपविण्याच्या दिशेने काम करत आहे असा आरोप
Goa News |Bus Service Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकार गोमंतकीयांचा व्यवसाय संपविण्याच्या दिशेने काम करत आहे. वाहतूक व्यवसाय जो आज गोमंतकीयांच्या हातात आहे तो देखील सरकार ५०० नवीन बसेस आणून बाहेरच्यांच्या हातात देऊन गोमंतकीयांना आत्महत्या करण्याकडे नेत आहे. कोरोनानंतर सरकारने बससाठीचे अनुदान अजून दिले नाही. आमचे प्रलंबित अनुदान सरकारने चतुर्थीपूर्वी दिले नाही, तर वाहतूक क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांना घेऊन आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा गोवा राज्य खासगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी दिला आहे.

सुदेश कळंगुटकर यांनी सांगितले, की माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आम्हाला वेळेत सबसिडी दिली. मात्र, प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आम्हा व्यावसायिकांचे हाल केले. वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणारे टॅक्सीचालक, ट्रक, रिक्षा आणि रेंट अ कॅब व्यावसायिक या सर्वांनाच आज सरकारने त्रास केला आहे. या त्रासाला सर्वजण कंटाळले आहेत. आम्ही आता सर्वजण एकत्र येऊन आंदोलन करणार आहोत.

अखिल गोवा बसमालक संघटनेचे सुदीप ताम्हणकर हे देखील वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी झटत आहेत. आम्ही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे, असेही कळंगुटकर यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्री गुदिन्हो ऐकत नाहीत’

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो ऐकत नाहीत आणि ते आपल्याला हवे ते करतात. त्यामध्ये गोमंतकीयांचा विचार होत नसल्याने आज व्यावसायिक संपत चालला आहे. इतर मंत्र्यांविषयी माहीत नाही, पण मंत्री गुदिन्हो मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाही हे आम्ही खात्रीने सांगू शकतो, असे सुदेश कळंगुटकर म्हणाले.

All Goa Private Bus Owner Association: सरकार गोमंतकीयांचा व्यवसाय संपविण्याच्या दिशेने काम करत आहे असा आरोप
E Bus: लवकरच गोव्यात ५०० 'ई बसेस' धावणार; वाहतूकमंत्री गुदिन्हो यांची माहिती

‘स्थानिक पक्षाला पाठिंबा देणार’

वाहतूक क्षेत्रात व्‍यवसाय करणारे टॅक्सीचालक, ट्रकचालक व इतर संबंधित व्यावसायिकांना भेटण्यासाठी चतुर्थीनंतर आम्ही मोहीम सुरू करणार आहोत. आम्हाला आता राष्ट्रीय पक्षांना पाठिंबा द्यायचा नाही हे आम्ही सर्वांनी नक्की केले आहे. आम्हाला आता स्थानिक पक्ष हवा आणि जो पक्ष आम्‍हाला सहकार्य करेल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका संदेश कळंगुटकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com