शारजाहमधून आलेले 5 प्रवासी DRIच्या ताब्यात; 2.12 कोटींचा तस्करीचा माल जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मंगळवारी 19 एप्रिल रोजी शारजाहून दाबोळी विमानतळावर आलेल्या पाच प्रवाशांकडून सुमारे 2.12 कोटी रुपयांचे सोने आणि तस्करीचा माल जप्त केला आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मंगळवारी 19 एप्रिल रोजी शारजाहून दाबोळी विमानतळावर आलेल्या पाच प्रवाशांकडून सुमारे 2.12 कोटी रुपयांचे सोने आणि तस्करीचा माल जप्त केला आहे. प्रवाश्यांना 2.291 किलो सोने बाळगल्यामुळे ताब्यात घेण्यात आले आहे. (5 passengers from Sharjah detained by DRI; 2.12 crore worth of smuggled goods seized)

Goa Crime News
'पोस्ट ऑफिसतर्फे 6 हजार जिंकण्याची संधी!' अशी सर्वत्र चर्चा; जाणून घ्या संपूर्ण सत्य

1.11 कोटी रुपये किमतीचे किलो सोने, 52.50 लाख रुपये किमतीचा अमेरिकन तंबाखू, 8 जुने लॅपटॉप आणि 49.08 लाख रुपये किमतीचे हाय एंड कॉम्बो ड्रोन असा एकूण 2.12 कोटी रुपयांचा मुद्देमाल संबंधित प्रवाशांकडून जप्त करण्यात आला आहे. शारजाहून मंगळवारी पहाटे गोव्यात आलेल्या प्रवाशांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे तस्करीचा माल असल्याचे आढळून आले. पाच आरोपींपैकी एक बिहार, 2 मुंबई आणि 2 यूपीचे आहेत. या सर्वांना जेएमएफसी मडगावने 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मुंबईस्थित यूट्यूब रॅपरला गोवा पोलिसांनी दिल्लीस्थित एका महिलेसह अटक केली आहे आणि 7 लाख रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह अटक करण्यात अली आहे. पोलिसांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. पोलिस अधीक्षक (उत्तर गोवा) शोभित सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपरचे नाव 25 वर्षीय एम.सी. कुर्बान उर्फ ​​कुर्बान शेख. तो मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com