Crime Against Women: गोव्यात दर आठवड्याला महिला-मुलांबाबत 5 गुन्ह्यांची नोंद; म्हापशात सर्वाधिक घटना

VAU ने 2014 पासून अशी एकूण 2,724 प्रकरणे हाताळली आहेत
Crime Against Women and Child
Crime Against Women and ChildDainik Gomantak

Crime Against Women and Child : राज्यात महिला आणि मुलांबद्दल घडणारे गुन्हे ही चिंतेची बाब बनली आहे. या गुन्ह्यांबद्दलची आकडेवारी विचार करायला भाग पाडणारी असून यावर सरकारतर्फे ठोस उपाययोजना व्हावी अशी मागणी सर्व स्थरातून होत आहे.

राज्य सरकारच्या पीडित सहाय्यता युनिट (VAU) ने सादर केलेल्या अहवालानुसार, मागील नऊ वर्षांत, दर आठवड्याला सरासरी पाच महिला आणि मुले गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. VAU ने 2014 पासून अशी एकूण 2,724 प्रकरणे हाताळली असून त्यापैकी 70% घटना या महिलांशी संबंधित आहेत.

Crime Against Women and Child
BJP In Goa : ‘एसटी’ आरक्षणाला पाठिंब्याचे आवाहन

ठिकाणानुसार घटनांची आकडेवारी

  • म्हापसा : 22.4%

  • पणजी : 11.5%

  • जुने गोवा : 7.3%

  • महिला पोलिस स्टेशन : 7.1%

  • पर्वरी : 6.5%

या घटनांमध्ये लैंगिक शोषण, घरगुती हिंसाचार, मानसिक ट्रॉमा समुपदेशन अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे. या आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, गुन्ह्याला बळी पडलेल्या मुलांपैकी जवळपास 50% मुले ही 0-15 या वयोगटातील आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात, पीडित महिलांवर लैंगिक, शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अहवालात सांगितल्याप्रमाणे 2,724 प्रकरणांपैकी 1,931 महिला/मुली होत्या तर 793 मुले होती.

याबाबत VAU चे प्रभारी इमिडियो पिन्हो म्हणाले की, लैंगिकता, मानवी विकास आणि कायद्याबद्दल मुलांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे, असे आम्हाला वाटते. असे दिसून आले आहे की, जागरूकता सत्रे ही फक्त मुलींसाठीच आयोजित केली जातात आणि मुलांना यापासून वगळले जाते. मात्र समाजच्या सर्व स्तरात ही जागरुकता निर्माण करणे काळाची गरज आहे, तरच आपण अशा घडणाऱ्या गुन्ह्यांवर आळा घालू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com