Goa News: गोव्यातील 44 जलाशय होणार संरक्षित! पाणथळ जागा व्यवस्थापनाअंतर्गत प्रस्ताव; कॅ. विरियातोंनी दिली माहिती

Viriato Fernandes: गोव्यातील जलाशयांच्या स्थितीबाबत गोवा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ४४ जलाशय ओळखली गेली आहेत, ज्यांना पाणथळ जागा व्यवस्थापनाअंतर्गत संरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे.
Capt. Viriato Fernandes
Capt. Viriato FernandesX
Published on
Updated on

Goa to protect 44 water bodies lakes

पणजी: राज्य सरकारने ३० सप्टेंबर रोजी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, पश्‍चिम घाटातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचा भाग म्हणून १२४७.७२ चौरस किलोमीटर क्षेत्र ८८ गावांसह जाहीर करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, यामधून २१ गावे वगळण्याचा प्रस्ताव आहे, ज्याचे क्षेत्रफळ २२६.१६ चौरस किलोमीटर इतके आहे. खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्‍‍नाला उत्तर देताना केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.

सदर उत्तरात म्हटले आहे की, राज्य सरकारने ही गावे वगळण्याचा प्रस्ताव दिला आहे, कारण ती प्रस्तावित निकषांमध्ये बसत नाहीत. या गावांचा समावेश केल्यास स्थानिक लोकांच्या उपजीविकेवर, रोजगारावर आणि आर्थिक विकासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम घाटाच्या पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबतचा सुधारित मसुदा ३१ जुलै रोजी प्रकाशित केला आहे.

सरकारची भूमिका आणि पुढील पावले

राज्य सरकारांनी पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राचा मसुदा अधिक बळकट करण्यासाठी उपजीविका, रोजगार, पर्यावरणीय स्थिरता आणि विकास यातील समतोल साधण्याकरिता सूचना दिल्या आहेत.

Capt. Viriato Fernandes
Sunburn Festival 2024: CM सावंत ठरवणार ‘सनबर्न’चे भवितव्‍य, सत्ताधारी बाकांवरील आमदारांनीच दर्शवला होता विरोध

15 ठिकाणी संरक्षण प्रक्रिया सुरू

गोव्यातील जलाशयांच्या स्थितीबाबत गोवा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ४४ जलाशय ओळखली गेली आहेत, ज्यांना पाणथळ जागा व्यवस्थापनाअंतर्गत संरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. यापैकी १५ जलाशयांचे आधीच संरक्षण जाहीर झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com