Reservation for women: 33 टक्के आरक्षण ही महिलांसाठी मोठी उपलब्धी

Reservation for women: खासदार तानावडे: डिचोलीत सार्वजनिक मंगलमूर्तीचे घेतले दर्शन
Sadanand Shet Tanawade
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak

Reservation for women: निवडणुकीत 33 टक्के आरक्षण म्हणजे महिलांसाठी मोठी उपलब्धी आहे. आरक्षणामुळे आता महिलांना मोठी संधी मिळणार आहे, असे मत राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले. 2027 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आरक्षण लागू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sadanand Shet Tanawade
Panjim Smart City: आभासी ‘स्मार्ट सिटी’ वास्तवात कधी?

डिचोलीच्या सार्वजनिक मंगलमूर्ती गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गोवा हे सुशिक्षित राज्य असल्याने या आरक्षणाचा राज्यातील महिलांना मोठा फायदा होणार आहे, असा विश्वासही तानावडे यांनी व्यक्त केला. या आरक्षणामुळे गोव्यात १३ महिलांना विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी खासदार तानावडे यांनी सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही मंगलमूर्तीचे दर्शन घेतले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसाद नाटेकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी खासदारांसह आमदारांचे स्वागत केले. दरम्यान, सार्वजनिक गणपतीचे येत्या गुरुवारी (ता. २८) अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यात येणार आहे.

किल्ले संवर्धनाचा देवालयातून संदेश

डिचोलीच्या सार्वजनिक गणपतीसमोर यंदा आकर्षक अशी पर्यावरणपूरक सजावट आणि गडकिल्ल्याचा देखावा करण्यात आला आहे. या देखाव्यातून किल्ले संवर्धनाचा संदेशही देण्यात आला आहे. खासदार तानावडे यांनी या सजावटीचे कौतुक करून गणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन केले. मंगलमूर्ती गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेवो आणि गणेशभक्तांच्या मनोकामना पूर्ण करो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com