Women In Goa Startup: देशापेक्षा गोव्याची सरासरी अधिक; स्टार्टअपमध्ये महिलांचा डंका

Women In Goa Startup: गोव्यातील 225 नोंदणीकृत स्टार्टअप्सपैकी 76 महिला संस्थापक किंवा सह-संस्थापक असलेली आहेत.
Women In Goa Startup
Women In Goa StartupDainik Gomantak

Women In Goa Startup

गोव्यात स्टार्टअप सुरु करण्यात महिलांचा सहभाग लक्षणीय असल्याचे एका ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. राज्यातील 225 नोंदणीकृत स्टार्टअपपैकी 33 टक्के महिला उद्योजकांनी स्थापन केले असून, ही आकडेवारी राष्ट्रीय सरासरी (18%) पेक्षा खूप जास्त आहे.

माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महिला उद्योजक स्टार्टअप्सच्या वाढीसाठी राज्याच्या धोरणांचा फायदा घेत आहेत, यामुळे आर्थिक विस्तार देखील होत आहे, असे विभागाच्या प्रतिनिधीने टाईम्सला सांगितले.

गोव्यातील 225 नोंदणीकृत स्टार्टअप्सपैकी 76 महिला संस्थापक किंवा सह-संस्थापक असलेली आहेत. यापैकी बहुतांश स्टार्टअप्स हॉस्पिटॅलिटी आणि सेवा क्षेत्रातील आहेत.

द वुमन इन इंडियाज स्टार्टअप इकोसिस्टम रिपोर्ट (WISER) अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, देशातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2017 आणि 2021 या काळात देशात 18 टक्के स्टार्टअपमध्ये वाढ झालीय.

स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल (SITPC) आणि इनक्यूबेटर्सनी अनेकांनी स्टार्टअप सुरू करण्यास मदत केल्याचे काही महिला संस्थापकांनी सांगितले.

राज्यातील काही महत्वाचे स्टार्टअप्स

ASIER सोल्युशन्स, I-Assist, Blurb Consultancy, Goenkart Digital World, Make It Happen, Tea Trunk, Contractzy

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com