3.20 लाखांचा गांजा जप्त, तरुणाला अटक

1 किलो चरस जप्त, झरवाडा येथे तरुणाला अटक
3.20 lakh cannabis seized, youth arrested
3.20 lakh cannabis seized, youth arrestedDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवसायाशी अनेकदा संबंध प्रस्थापित झाला असला, तरी असे व्यवहार पूर्णत: उखडून काढण्यासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी विभागाबरोबर शेजारील राज्यांशी समन्वयाची आवश्‍यकता आहे. तरच असे व्यवहार करणाऱ्या टोळीपर्यंत पोहोचता येते. राज्यात ‘झिरो टॉलरन्स फॉर ड्रग्स’ या धोरणानुसार गोवा पोलिस अधिक सक्रिय होतील, असा आशावाद नवे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी व्यक्त केला आहे. (Goa Crime News updates)

अशातच हणजूण पोलिसांनी (Police) झरवाडा येथे हिगांता यासूजी (59) या जपानी नागरिकास अटक करून त्याच्याकडून 1 किलो चरस आणि गांजा मिळून 3.20 लाखांचा ड्रग्स जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. झरवाडा येथे हा नागरिक संशयित रूपात आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे विचारणा केली आणि तपासात त्याच्या बॅगमध्ये चरस आणि गांजा आढळून आला.

3.20 lakh cannabis seized, youth arrested
'...त्यामुळे 40 टक्के कमी दरात गॅस उपलब्ध होणार'

दरम्यान, मनमाडहुन 4.3 किलो गांजा घेऊन निझामुद्दीन एक्सप्रेस मधून गोव्यात आलेल्या थनाराम या राजस्थान येथील संशयिताला आज रेल्वे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या मदतीने अटक केली. या मालाची किंमत 4 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत असून गोव्यात (goa) हा गांजा विकण्यासाठी तो घेऊन आला होता असे सांगितले गेले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर सापळा रचून मडगाव (margao) रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली.

त्याची झडती घेतली असता ताच्याकडे दोन पिस्तुले आणि 18 काडतुसेही सापडली. हा सारा माल जप्त करून नंतर त्याला अमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com