लेखक अनुभवलेलं जगणं, सभोवतालचं वातावरण, घडलेले प्रसंग शब्दबध्द करतो. साहित्य जगण्याची ऊर्मी देते. वेदना पचवण्याचे सामर्थ्य त्यात असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका तथा लोकवेदच्या अभ्यासक पौर्णिमा केरकर यांनी केले.
साहित्य लेणी प्रतिष्ठान, ताळगाव आणि कला निकेतन सांस्कृतिक मंडळ, चिंचोळे यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात ‘लिहिणाऱ्या हातांचा उत्सव’ उपक्रमांतर्गत मराठी कवी संमेलनात त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर मुंबईतील कवयित्री तथा गीतकार डॉ. संगीता गोडबोले, लेखक तथा गायक दुर्गाकुमार नावती, लेखिका रजनी रायकर, दीपा मिरिंगकर, कला निकेतनचे अध्यक्ष शेखर खांडेपारकर, साहित्य लेणीच्या संयोजिका चित्रा क्षीरसागर, कवी प्रकाश क्षीरसागर उपस्थित होते.
कविसंमेलनात तब्बल ३२ कवींनी कविता सादर केल्या. रजनी रायकर, दीपा मिरिंगकर यांनीही मनोगत व्यक्त केले. चित्रा क्षीरसागर यांनी स्वागत केले. शर्मिला प्रभू यांनी सूत्रसंचालन केले.
कविसंमेलनात बहुतेक कविता वर्षा ऋतुला वाहिल्या होत्या. महेश पारकर, कविता सामंत, नंदिनी कुलकर्णी, आसावरी भिडे, नितीन कोरगावकर, सुनीता शहा, नूतन दाभोलकर, शर्मिला प्रभू, लक्ष्मी महात्मे, दामोदर मळीक, लक्ष्मण पित्रे, संदीप मणेरीकर, तृप्ती बांदेकर, जेनेट बाेर्जिस, रेखा पौडवाल, आसावरी कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, विश्वनाथ जोशी, विठ्ठल शेळके, उमेश शिरगुप्पे, सुनीता फडणीस, मंजिरी वाटवे, दया मित्रगोत्री, प्रमोद कारापूरकर, दुर्गाकुमार नावती, दीपा मिरिंगकर, कविता आमोणकर, माधुरी उसगावकर, सुभाष शहा, रजनी रायकर, प्रकाश क्षीरसागर यांनी कविता सादर केल्या.
साहित्य फुलवण्याचे समृद्ध करण्याचे काम या उपक्रमातून करत आहात. गोव्याचे आणि माझे ऋणानुबंध असून गोव्याने मोठे साहित्यिक, मंगेशकरांसारखी गानरत्ने दिली आहेत. माझ्या रचना गोमंतकीय गायकांनी गायिल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.