31st December Celebration: पालकांनो, थर्टी फर्स्ट आला, कुमारवयीन मुलांना सांभाळा!

मद्याचा पहिला घोट वा घेतलेली चव व्‍यसनाची नांदी
New year Party| Christmas Party| Hangover
New year Party| Christmas Party| HangoverDainik Gomantak
Published on
Updated on

31st December Celebration: ‘मद्याचा पहिला घोट तुमच्‍या मुलाचे आयुष्‍य बरबाद करू शकतो. ३१ डिसेंबरचा दिवस जवळ आला आला आहे. पालकांनो, तुमच्‍या कुमारवयीन मुलांना सांभाळा’, असे आवाहन प्रसिद्ध मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी केले आहे.

New year Party| Christmas Party| Hangover
Goa News Update 29 December 2023: वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर

डॉ. पाटकर यांनी या संदर्भात म्‍हटले आहे, ‘३१ डिसेंबरला मजा करण्‍याच्‍या नावाखाली बऱ्याचदा व्यसनाधीनतेचे बीज रोवले जाते. मद्याचे कुतूहल शमवण्‍याच्‍या उत्‍कंठेमधून कुमारवयीन मुलांचा पाय घसरण्‍याचा मोठा संभव असतो.

तसे निरीक्षणातून आढळूनही आले आहे. मद्याचा पहिला घोट वा घेतलेली चव ही व्‍यसनाची नांदी ठरते. तसेच दारू हा ‘गेट वे ड्रग’ आहे. कोणाही ड्रग ॲडिक्‍ट व्‍यक्‍तीची सुरुवात दारूच्‍या पहिल्‍या घोटानेच झालेली असते. म्‍हणूनच ३१ डिसेंबरला खबरदारी घेणे महत्त्‍वाचे आहे.

समजून घेण्‍याची गोष्‍ट....

१. दारूचे व्यसन किंवा कोणत्याही ड्रगचे व्यसन हा आजार असतो. म्‍हणूनच त्‍या वाटेला कधीही न जाणे चांगले.

२. अशा लोकांच्या मेंदूची रचना अशी असते की, त्यांनी एकदा दारू घेतली की त्यांना पुन्हा पुन्हा घ्यावीशी वाटते.

३. परंतु या लोकांनी दारूची कधीच चव घेतली नाही तर त्यांच्या मेंदूची रचना व्यसनाला पूरक असली तरी ते दारूडे होणार नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com