समतानगर, हाउसिंग बोर्ड- म्हापसा येथे खुल्या जागेतील पार्किंगमधील दुचाकीमधून पर्स चोरून ११ हजार रोकड चोरल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित अभिजित पेडणेकर (३८, रा. तुये पेडणे) याला अटक केली आहे. चोरीची घटना १५ डिसेंबर रोजी घडली होती.
संशयिताने फिर्यादी रामनाथ हडफडकर यांच्या दुचाकीमधून पर्स चोरली होती. त्यात ११ हजार रुपये होते. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. पोलिसांनी त्यावरून माग काढत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी संशयिताकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
गोवा आणि महाराष्ट्रातील या दोन राज्यातील ट्रक मालकांमध्ये असलेल्या संघर्षावरून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आज, शुक्रवारी महाराष्ट्रातील माजी खासदार निलेश राणे, आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दामू नाईक आदींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.
सरकारी नोकर भरती आयोगाचा शब्द अखेर मुख्यमंत्र्यांनी पाळला. काही आमदार आणि मंत्र्यांच्या अंतर्गत विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांकडून धाडसी निर्णय. अडचणी निर्माण करणाऱ्या काही सरकारी अधिकाऱ्यांना बाजूला काढून 33 पदांसाठीची पहिली जाहिरात जारी. पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत 22 जानेवारी 2024.
पारंपरिक रेती व्यवसाय कायदेशीररित्या लवकर सुरू करा. पोरस्कडे न्हयबाग स्थानिक व्यावसायिक यांची पत्रकार परिषदेत मागणी.
भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) ॲग्मूट केडर २००६ मधील पोलिस उपमहानिरीक्षक आत्माराम देशपांडे यांची पोलिस महानिरीक्षकपदी (आयजीपी) बढती झाली आहे. सध्या ते दिल्ली पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. पोलिस महानिरीक्षकपदी बढती मिळालेले ते तिसरे गोमंतकीय आहेत. यापूर्वी गोमंतकीय प्रभाकर सिनारी व अँथनी डिसोझा हे पोलिस महानिरीक्षक पदापर्यंत पोहचले होते.
चोपडे येथे मुख्य रस्त्यावर आज, शुक्रवारी दुपारी अचानक एक कार उलटली. ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात कुणीही गंभीर जखमी झाले नाही. पण या रस्त्यावर बराचकाळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघात होताच कारचालकाने कारच्या दोन्ही नंबरप्लेट काढून टाकल्या.
कळंगुट पोलिसांनी कळंगुट येथील डोंगरपूर जंक्शन नाईकवाडो येथे टाकलेल्या छाप्यातून ९४० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. २८ डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ ते साडे अकरा दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
यात मोस्तफिजुर छापेर अली मंडल (वय 35) याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल येथील आहे.
Mla Jit Arolkar: आमदार जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. पेडणे तालुक्यातील 30 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत व्यावसायिक आस्थापना आणि खाजगी व्हिला/फ्लॅट्स इत्यादींना नवीन पाणी जोडणी देऊ नये, अशी विनंती करणारे निवेदन सादर केले.
Tourist In Goa: नववर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. राज्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेले आहेत.
Sunburn Goa 2023: सनबर्नच्या स्क्रिनवर महादेवाचा फोटो दाखवण्यात आला, त्यासमोरच लोक मद्य प्राशन करुन नृत्य करत आहेत सनातन धर्माचा अवमान केला आहे. सनबर्न महोत्सव मद्य प्रमोशन करण्याचा देवाचा वापर करत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जावा. पोलीस महासंचालकांनी याची दखल घ्यावी असे अमित पालेकर यांनी म्हटलंय.
Sunburn Goa 2023: सनबर्नच्या 82.50 लाख किंमतीच्या तब्बल 600 पासची चोरी झाल्याचे उघकीस आले असून, आयोजक टीममधूनच ही चोरी झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच कर्मचाऱ्यांना अटक केलीय.
गोव्यात झालेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंबधित मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्पर्धेत सहभागी तब्बल 25 खेळाडूंची डोपिंग चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
Borim Accident: बोरी पुलावर कंटेनर आणि कारचा अपघात झाल्याने मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अपघातग्रस्त वाहने मार्गातून हटवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Sunburn Goa 2023: सनबर्न महोत्सवातून दोन मुलींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलींना नेमकं कोणत्या कारणासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Bicholim Highschool Theft: चोरांनी केले शाळांना 'टार्गेट'. डिचोलीतील शांतादुर्गा हायस्कूल फोडले. मुख्याध्यापीकेच्या कॅबिनमधील मिळून तीन कपाटा आनी टेबलचे ड्रॉवर फोडले. पोलिस घटनास्थळी दाखल.
Goa Accident: खोर्जुवे येथे दोन दुचाकींचा अपघात झाला असून, दोघे दुचाकी चालक जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री हा अपघात झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.