Bicholim News: नदीत उडी मारून युवकाची आत्महत्या! विठ्ठलापूर येथील पुलाजवळील घटना

Bicholim News: मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim News: नदीत उडी मारून एका 30 वर्षीय युवकाने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ही घटना आज (सोमवारी) दुपारी विठ्ठलापूर-कारापूर येथे घडली.

Goa Crime News
ख्रिसमसदिवशीच त्याच्यासाठी धावून आला 'देवदूत'! बांबोळीत अपघातग्रस्त युवकाला CPR मुळे मिळाले जीवदान...

उपलब्ध माहितीनुसार, विठ्ठलापूर येथील व्यंकटेश्वर बसवराज कुयकर या युवकाने पुलावरून नदीत उडी मारल्याचे सांगण्यात येते. पोलिसांंनी याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केल्यानंतर दलाचे अधिकारी राहूल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडींग फायर फायटर साईनाथ केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शैलेश साळकर, योगेश माईणकर, हर्षद सावंत आणि गौरेश गावस या जवानांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

सदर युवकाने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस परिसरातील नागरिकांशी याबाबत चौकशी करत आहेत.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com