Goa Government Job: 147 पदांसाठी 30 हजार उमेदवार

Goa Government Job: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या कार्यालयातील 147 गट ‘क’ पदांसाठी जाहीर केलेल्या नोकऱ्यांसाठी 30 हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी नावनोंदणी केली आहे.
Goa Government Job
Goa Government JobDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government Job: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या कार्यालयातील १४७ गट ‘क’ पदांसाठी जाहीर केलेल्या नोकऱ्यांसाठी ३० हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी नावनोंदणी केली आहे. विविध निवड चाचणींना बसलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र पोस्टाने किंवा ईमेल सारख्या इतर माध्यमातून प्राप्त झाले नसल्यास अधिकृत गोवा सरकारच्या वेबसाइटवरून डाउनलोड करण्यास सांगितले आहे.

Goa Government Job
Goa Crime News: विद्यार्थिनीचा विनयभंगाप्रकरणी शिक्षकाच्‍या बडतर्फीसाठी शिफारस

कौशल्य चाचणी/ लेखी चाचणींसह निवड चाचणी 29 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. २०१९ मध्ये या पदांची जाहिरात करण्यात आली होती. जवळपास ३०,११० उमेदवारांनी परीक्षांना उत्तर देणार आहेत. ९२ निम्न विभागीय लिपिक (एलडीसी) पदांसाठी १५,५९९ उमेदवार,

१५ कनिष्ठ लघुलेखक पदांसाठी १९५३ उमेदवार, ३१ मल्टी-टास्किंग स्टाफसाठी ६०५० उमेदवार आणि ९ तलाठी पदांसाठी ६५०८ उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने नमूद केले आहे, की त्यांनी उमेदवारांना प्रवेशपत्रे आधीच पोस्ट केली आहेत. या व्यतिरिक्त प्रवेशपत्र https://southgoa.nic.in/recruitment/ या वेबसाइटवरून आणि सरकारच्या गोवा सरकार पोर्टलवरून देखील डाउनलोड केले जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com