
तन्वी वस्त आणि बँक मॅनेजर आनंद जाधव यांच्या विरोधात कुडतरी पोलिस ठाण्यात पाच अतिरिक्त तक्रारी आणि 4 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 24 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
धर्मापूर येथे कारच्या धडकेत पादचारी अल्फेड अफोन्सो यांचा मृत्यू झाला. कारचालक राहुल डिकोस्ता (रा. कुडतरी) याला मडगाव पोलिसांनी अटक केली आहे.
रुमडामळ येथे शाळेतील क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनावेळी नायट्रोजन गॅसने भरलेल्या फुग्यांना आग लागल्याने, पोलीस अधीक्षक (ट्रेनिंग) सुचिता देसाई जखमी झाल्या. प्रथमोपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
मडगाव: गोहत्या प्रकरणात मायणा कुडतरी पोलिसानी मैल्कजन बसिरा बेपारी (35) याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्याच्याकडून एक जिवंत गाय व काही किलो मांस जप्त करण्यात आले आहे. संशयित मूळ उसगांव तिस्क येथील आहे. झोड्डीम माकाझण येथे एका खुल्या जागेत तो वरील काम करत होता. त्याच्या विरोधात पोलिसांनी गोहत्या बंदी, पशु क्रूरता कायदा व 325 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल गिरी पुढील तपास करीत आहेत.
माशेल येथील स्कूटर चोरी प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या दिल बहादूर महातो याला फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाने 20 दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
हरमल येथे मांद्रे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शर्मीन शेख उर्फ मारिया (रा. गुजरात) हीला देहव्यापार प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. यावेळी दोन पीडित मुलीची सुटका करण्यात आली.
'वेदांता'च्या खनिज वाहतूकप्रश्नी 'सुवर्णमध्य' काढण्यासाठी मध्यस्थी करणार. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांची ग्वाही. आंदोलनकर्त्यांसह 'वेदांता'च्या कामगारांनी घेतली आमदारांची भेट. दोन्ही गटांनी आमदारांसमोर मांडले आपापले दुखणे.
मडगाव येथील जुने स्टेशन रोडवरील गंगा मेटल मार्ट दुकानावर दरोडा. चोरट्यांनी सुमारे 4-5 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे ईमेल खाते काही वेळापूर्वी हॅक झाले झाले होते. ते पुनर्प्राप्त करण्यात यश आलेले आहे.
धारगळ येथे सनबर्न होण्यास विरोध , वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा काही सरपंच, पंच आणि नागरीकांचा इशारा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.