Dabolim Airport: दहा वर्षांची प्रामाणिक सेवा, दाबोळी विमानतळावर पार पडला अनोखा सेवा निवृत्ती सोहळा

बॉम्ब शोधक पथकात ड्यूटी बजावणाऱ्या 3 श्वानांना आज सेवेतून निवृत्त करण्यात आले.
3 Soldiers TAKSHAK , S.HERO, TIGER retired from duty From CISF
3 Soldiers TAKSHAK , S.HERO, TIGER retired from duty From CISFDainik Gomantak

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) विमानतळ सुरक्षा गटाच्या बॉम्ब शोधक पथकात ड्यूटी बजावणाऱ्या 3 श्वानांना आज सेवेतून निवृत्त करण्यात आले. जवळपास 10 वर्षांच्या सेवेनंतर हे तीन श्वान निवृत्त झाले. तिघांनाही दाबोळी विमानतळावर जवानांनी निरोप दिला. 

3 Soldiers TAKSHAK , S.HERO, TIGER retired from duty From CISF
चंद्रावरील प्रज्ञानची 'ती' ईमेज खोटी, गोव्याच्या आयटी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसची मागणी

याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी ट्विट करीत दिली. अधिकाऱ्यांनी या तिन्ही श्वानांना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. याशिवाय तिन्ही श्वानांनाही पदके देण्यात आली आहेत. यावेळी सीआयएसएफच्या जवानांसह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

जवळपास 10 वर्षांच्या सेवेनंतर तक्षक, शेरो, टायगर हे तिन श्वान बॉम्ब शोधक पथकातून निवृत्त झाले. प्रवाशांच्या सुरक्षित हवाई प्रवासासाठी या तिन्ही श्वानांचे योगदान मोठे आहे.

आज झालेल्या सत्कार समारंभात त्यांना दत्तक घेण्यास स्वारस्य दाखवलेल्या पाळीव प्राणी प्रेमींकडे हे तिन्ही श्वान सुपूर्द करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com