Goa Train: धावती ट्रेन पकडण्याचा मोह अंगलट, गोव्याला येणाऱ्या ट्रेनमधून कोसळून 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Vasco-Da-Gama Express: मृत तरुण वारंवार प्लॅटफॉर्मवरुन ट्रेनमध्ये चढउतार करत होता. दराम्यान, त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या गॅपमध्ये पडला.
Man dies after falling between platform and Goa-bound Express train
Vasco-Da-Gama ExpressDainik Gomantak
Published on
Updated on

सिकंदराबाद: धावती ट्रेन पकडण्याचा मोह २८ वर्षीय तरुणाच्या अंगलट आला आहे. ट्रेन पकडताना पाय घसरुन प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध पडल्याने या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोव्याला येणाऱ्या वास्को – द – गामा एक्सप्रेसमध्ये सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर शुक्रवारी (०६ जून) सकाळी साडे दहा वाजता हा अपघात झाला.

वुरुगोंदा साई (वय २८, रा. करिमाबाद, वारांगल) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत तरुण त्याची पत्नी, भाऊ आणि तीन मित्रांसोबत प्रवास करत होता. वास्को – द – गामा एक्सप्रेसमध्ये त्यांनी एस-४ कोचमध्ये आरक्षण केले होते. मृत तरुण वारंवार प्लॅटफॉर्मवरुन ट्रेनमध्ये चढउतार करत होता. दराम्यान, त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये असलेल्या गॅपमध्ये पडला व गंभीर जखमी झाला.

Man dies after falling between platform and Goa-bound Express train
Betul Fort: छत्रपती शिवाजी महाराजांचे अपूर्ण कार्य गोवा सरकार पूर्ण करणार; राज्यातील शिवरायांचा एकमेव किल्ला पुन्हा बांधणार

जखमी वुरुगोंदा साईला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, १२.२३ वाजता त्याची प्राणज्योत मालवली. दोन तासांपेक्षा कमी वेळात तरुणाचा मृत्यू झाला, अशी माहिती सिकंदराबाद पोलिसांनी द हिंदू या वृत्तपत्राला दिली आहे. या प्रकरणी मृत तरुणाच्या पत्नीने तक्रार दाखल केली असून, पोलिस अधिक तपास करतायेत. दरम्यान, पोलिसांनी या घटनेत घातपाताची शक्यता फेटाळली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com