GST On Casino & Gaming: ऑनलाईन गेमिंग, कॅसिनोवर 1 ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी

जीएसटी लागू झाल्यानंतर सहा मिहिन्याच्या कालावधीनंतर त्याचा आढावा घेतला जाणार आहे.
GST On Casino & Gaming
GST On Casino & GamingDainik Gomantak
Published on
Updated on

GST On Casino & Gaming: कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंगवर देशात 01 ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी लागू केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी यापूर्वीच याबाबत घोषणा केली होती. जीएसटी लागू झाल्यानंतर सहा मिहिन्याच्या कालावधीनंतर त्याचा आढावा घेतला जाणार आहे.

जुलै महिन्यात जीएसटी कौन्सिलच्या झालेल्या बैठकीत जीएसटी करासह इतर काही गोष्टींवर विचार करण्यात आला. ग्रॉस गेमिंग रेव्हेन्यू (GGR) वर GST लावावा की प्लॅटफॉर्मद्वारे आकारले जाणारे शुल्क यावरही बैठकीत चर्चा झाली.

कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंगवर 01 ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंग महाग होणार आहे. गोव्याची अर्थव्यवस्था कॅसिनो उद्योगावर अवलंबून असल्याने राज्य सरकारने या करवाढीला विरोध केला होता. केंद्र सरकारने या निर्णया फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली होती.

GST कौन्सिलच्या मंत्रिगटाने (GoM) कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के GST लावण्याचे मान्य केले. मात्र, गोवा सरकारने त्याला असहमती दर्शवत 28 ऐवजी 18 टक्के जीएसटी आकारण्याची सूचना केली होती.

दरम्यान, सरकाने 01 ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील कॅसिनो आता महागणार आहेत. या करवाढीचा पर्यटन आणि कॅसिनो व्यवसायावर कसा परिणाम होतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bombay High Court Goa Bench Casino Order
Goa Mandovi River Casino Dispute
New Casino Vessel Permission
Mandovi River Casino PIL
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com