Tillari Canal: तिळारीच्या कालव्यात बुडून म्हापशातील 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mapusa Goa News: ओंकारने पाण्यात उडी घेतली पण, बराचवेळ तो बाहेर आला नसल्याने त्याच्या मित्रांना संशय आला.
26-Year-Old Mapusa Man Drowns in Tillari Canal, Goa
Tillari Canal Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: तिळारीच्या कालव्यात म्हापशातील २६ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. कुचेली दत्तप्रसाद कॉलनी येथे असलेल्या जल प्रक्रिया प्रकल्पाजवळ गुरुवारी (२४ एप्रिल) दुपारी एक वाजता ही घटना घडली. तरुण मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली.

ओंकार प्रभूदेसाई (वय २६, रा. शेट्येवाडा - म्हापसा) असे कालव्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार त्याच्या काही मित्रांसोबत तिळारी कालव्यात पोहोण्यासाठी गेला होता. ओंकारने पाण्यात उडी घेतली पण, बराचवेळ तो बाहेर आला नसल्याने त्याच्या मित्रांना संशय आला. मित्रांनी अग्निशमन दलाला संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.

26-Year-Old Mapusa Man Drowns in Tillari Canal, Goa
Goa Made Liquor: जंगलात लपवून ठेवली दारु; चिपळूणमध्ये गोवा बनावटीचे 21.66 लाख किंमतीचे मद्य जप्त

अग्निशमन दल आणि म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कालव्यात बुडालेल्या ओंकारला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा करुन ओंकारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील रुग्णालयात पाठवला आहे. म्हापसा पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com