Mapusa Urban Bank: ‘म्हापसा अर्बन’कडून 250 कोटी वितरित

99% दावे निकालात- 1629 प्रकरणे बंद, 113 मालमत्तांचा लिलाव
Mapusa Urban Co-Operative Bank
Mapusa Urban Co-Operative Bank Dainik Gomantak

Goa: दिवाळखोरीत असलेल्या म्हापसा अर्बन बँकेने आपल्या लिक्विडेशनच्या प्रक्रियेत आत्तापर्यंत ठेवीदारांच्या एकूण मिळालेल्या दाव्यांपैकी 99 टक्के दावे निकाली काढले. ज्यानुसार 250 कोटी रुपये वितरित केलेत.

या बँकेचे लिक्विडेटर अँथनी डिसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने 30 कोटी रुपयांहून अधिक कर्जाची रक्कम वसूल केली आणि 1629 प्रकरणे बंद केली. तर 113 मालमत्ता सार्वजनिक लिलावांद्वारे सुमारे 20 कोटी रुपयांना विकल्या.

म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ गोवा लि. ही 16 एप्रिल 2020पासून दिवाळखोरीत काढण्यात आली. त्यानंतर लिक्विडेटरने 20 जुलै 2020 रोजी बहुराज्य सहकारी संस्था नियमांतर्गत सार्वजनिक नोटीस जारी केलेली.

Mapusa Urban Co-Operative Bank
Sports: अभिमानास्पद ! अंधत्‍वाला मागे सारून तिस्क-उसगाव येथील पॅरा-ॲथलिट साक्षीची 'रौप्य' पदकाला गवसणी

या नोटीसीनुसार सर्व खातेदारांनी त्यांचे दावे सादर करावेत, असे कळविले. त्यानंतर लिक्विडेटरने 31 मार्च 2022 पूर्वी शेवटची तसेच अंतिम संधी देत दावा न केलेल्या ठेवीदारांना जाहीर सूचना जारी केली होती.

लिक्विडेटर अँथनी डिसा यांनी सांगितले, की बँकेने एकूण मिळालेल्या 33,570 दाव्यांपैकी 33,046 ठेवीदारांचे दावे निकाली काढले. त्यानुसार 5 लाख रुपयांपर्यंतच्या दाव्यांची 99 टक्के निपटारा केला, जी हमी रक्कम आहे. या आकड्यानुसार बँकेने आतापर्यंत 250 कोटी रुपये वितरित केलेत.

म्हापसा अर्बन बँकेचे एकूण 1.12 लाख ठेवीदार होते. त्यापैकी 33,570 ठेवीदारांनी 250 कोटी रुपयांचे दावे सादर केले होते. मात्र सुमारे 78,430 ठेवीदारांनी अद्याप दावा केला नाही, जी रक्कम 100 कोटी रुपये आहे.

अनेक नोटीसा व स्मरणपत्रे देऊनही संबंधितांनी दावे सादर केले नाहीत, त्यांच्यापैकी 94 टक्के लोकांच्या रु.1000 पेक्षा कमी ठेवी आहेत. आणि याच कारणामुळे संबंधितांनी दावे सादर केले नसतील.

Mapusa Urban Co-Operative Bank
Union Budget 2023: अर्थसंकल्पात गोव्याला ठेंगा मात्र कर्नाटकला...

त्याचप्रमाणे 4,738 व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे सरासरी 48,000 रुपये ठेव आहेत, असेही लिक्विडेटरने सांगितले. अशावेळी ज्या ठेवीदारांनी दावे सादर केले नाहीत, त्यांनी त्यांचे दावे लवकरात लवकर सादर करावेत. जेणेकरून त्यांना लाभ घेता येईल, असे आवाहन लिक्विडेटरांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की, दोन तृतीयांश प्रकरणांमध्ये पूर्ण पुनर्प्राप्ती झाली आहे. आता केवळ 835 प्रकरणे वसूल करणे बाकी आहे. आणि ही प्रकरणे कोणत्या ना कोणत्या न्यायालयात सध्या प्रलंबित आहेत.

मागील वर्षभरात लिक्विडेटरने सार्वजनिक लिलावांद्वारे 113 मालमत्तांची विक्री सुमारे 20 कोटी रुपयांमध्ये केली आहे. ज्यामध्ये साखळी, वास्को, कळंगुट, रेईशमागूश व फोंडामधील बँकेच्या शाखा होत्या. तर पर्वरीमधील एक घर तसेच शंभरपेक्षा अधिक म्हापसा व सांतेईनीज मधील दुकानांचा समावेश होता.

लक्षणीय कर्जवसुली

1,469 व्यक्ती आहेत ज्यांच्या 5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा आहेत. या दाव्यांची शिल्लक रक्कम कायद्यानुसार लिक्वेशन प्रक्रियेच्या शेवटीच निकाली काढली जाऊ शकते.

कर्जाच्या वसुलीबाबात भाष्य करताना लिक्विडेटरने सांगितले की, बँकेने थकीत कर्जे वसूल करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. लिक्विडेशनच्या वेळी थकीत असलेल्या 2,464 कर्ज प्रकरणांपैकी बँकेने 30 कोटी रुपये वसूल केलेत आणि 1,629 प्रकरणे बंद केली, असे डिसा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com