National Games 2023 Goa
National Games 2023 Goa Dainik Gomantak

Goa Sports News: तब्बल 25 खेळाडू डोपिंगमध्ये नापास

Goa Sports News: तात्पुरते निलंबन देशातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश
Published on

Goa Sports News: गोव्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंपैकी 25 ॲथलीट उत्तेजक द्रव्य चाचणीत (डोपिंग) दोषी आढळले असून त्यांचे तात्पुरते निलंबन केल्याची माहिती मिळाली आहे. चाचणीत नापास झालेल्या खेळाडूंमध्ये काही राष्ट्रीय विजेते, तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूही असल्याचे समजते.

National Games 2023 Goa
Sunburn Festival: हणजूण कोमुनिदाद झाली मालामाल

37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोव्यात 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत झाली होती. त्यात सर्वाधिक 42 खेळांचा आणि दहा हजारांहून जास्त क्रीडापटूंचा सहभाग होता. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) मान्यतेने घेण्यात आली होती. चाचणीत दोषी आढळलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 खेळाडूंपैकी सात पदक विजेते खेळाडू असून एक खेळाडू वेटलिफ्टिंगमधील सुवर्णपदक विजेता आहे. या खेळाडूंना उत्तेजकविरोधी शिस्तपालन मंडळासमोर (एडीडीपी) बाजू मांडावी लागेल.

त्यानंतर खेळाडूंवरील कारवाईविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, खेळाडूंच्या ‘ब’ नमुना चाचणीनंतर आणखी खेळाडूंची नावे उघड होऊ शकतात.

अहवाल ‘आयओए’ला सादर

राष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, यात विविध खेळांतील खेळाडूंचा समावेश आहे. डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूंनी बंदी असलेल्या द्रव्याचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेने (नाडा) यासंबंधीचा अहवाल भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) सादर केला आहे. मात्र, यासंबंधीची अधिकृत माहिती उघड केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com