Basilica of Bom Jesus: शवदर्शनासाठी येणार 20 लाख भाविक

Basilica of Bom Jesus: पुढील वर्षी होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळ्यासाठी जगभरातून 20 लाख भाविक येतील, अशी चर्चने अपेक्षा ठेवली आहे.
Basilica of Bom Jesus
Basilica of Bom JesusDainik Gomantak
Published on
Updated on

Basilica of Bom Jesus: पुढील वर्षी होणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळ्यासाठी जगभरातून 20 लाख भाविक येतील, अशी चर्चने अपेक्षा ठेवली आहे. पुढील वर्षी प्रथमच या सोहळ्याचे जगभरात थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रक म्हणून फादर फेन्री फल्काव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Basilica of Bom Jesus
Panjim Fest: महापालिकेला फेस्तातून 47 लाखांचा महसूल

सेंट फ्रान्सिस झेवियर यांनी मलेशिया, जपान आणि इंडोनेशियाचा दौरा केला होता. त्या ठिकाणच्या चर्चने या सोहळ्यात सहभागी व्हावे यासाठी औपचारिक निमंत्रण गोव्यातील चर्चकडून रवाना करण्यात आलेले आहे. पुढील वर्षी २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत हा सोहळा होणार आहे

बासालिका ऑफ बॉम जीझस या चर्चमधून २१ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजता मिरवणुकीने सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव आर्चबिशपांची चर्च म्हणून ओळखल्या जाणाऱ्या से कॅथेड्रल चर्चमध्ये नेण्यात येणार आहे. तेथे हे शव ५ जानेवारी २०२५ पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. या पूर्ण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था चर्च आता करू लागली आहे. जगभरात हे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com