Shram-Dham Yojana: 20 कुटुंबांना मिळणार घरांच्या चाव्या; लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते हस्तांतरण

मार्च महिन्यात या योजनेला सुरवात करण्यात आली होती.
Shram-Dham Yojana
Shram-Dham YojanaDainik Gomantak
Published on
Updated on

Shram-Dham Yojana: सभापती रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या राज्यातील अनोख्या श्रम-धाम योजनेतील वीस घरांचे गुरुवारी (ता.१५) लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात येणार आहे.

मार्च महिन्यात या योजनेला सुरवात करण्यात आली होती. आतापर्यंत ज्या रहिवाशांना पक्के छप्पर नाही, अशा वीस कुटुंबांना पक्के घर बांधून देण्यात आले आहे.

Shram-Dham Yojana
Girish Chodankar : स्वार्थप्रेरित भावनेतून जमिनीचे रूपांतर! गिरीश चोडणकरांची विश्वजीत राणेंवर टीका

राज्यातील प्रत्येक व्यक्तीने एक रुपया किंवा एक दिवस या उपक्रमासाठी देण्याचे आवाहन सभापती तवडकर यांनी केले होते. त्यानंंतर राज्यभरातून आर्थिक मदत त्याचबरोबर श्रम करण्यासाठी कार्यकर्ते शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवसांत काणकोणात राबले.

ही योजना राबविण्यासाठी बलराम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात संध्याकाळी ४ वाजता आयोजित विशेष कार्यक्रमात बिर्ला यांच्या हस्ते या घरांच्या चाव्या घरमालकांना देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मंत्री उपस्थित राहतील, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

श्रम-धाम योजनेचे राज्यातील अन्य मतदारसंघांतही कौतुक करण्यात येत आहे. तिचा विस्तार सांगे, केपे मतदारसंघांतही करण्यात येणार आहे. यापुढे दोन-तीन वर्षांत काणकोण मतदारसंघात दीडशे घरांची उभारणी लोकसहभागातून करण्याचा मानस सभापती तवडकर यांनी बोलून दाखविला.

सचित्र माहिती पुस्तक

यावेळी श्रम-धाम योजनेच्या सचित्र माहिती पुस्तकाचे विमोचन करण्यात येणार आहे. या माहिती पुस्तकात सर्व वीसही घरांची व घरमालकांची माहिती असणार आहे. त्यामध्ये त्यांचा पूर्वीचा निवारा, त्यानंतर घराची बांधणी व पूर्ण घराची बांधणी झालेले फोटो यांचा समावेश असणार आहे.

शासनाच्या निवारा नसलेल्या रहिवाशांसाठी अनेक योजना आहेत. मात्र, जमिनीची मालकी व अन्य कारणांमुळे या योजनांचा फायदा त्यांना घेता येत नाही. त्यासाठी त्यांना किमान आसरा उपलब्ध करून द्यावा या हेतूने श्रम-धाम योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्याला नागरिकांकडून अपूर्व असा प्रतिसाद लाभला - रमेश तवडकर, सभापती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com