पणजी: राज्यासाठीची ‘मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजना’ येत्या 1 डिसेंबरपासून सुरू होणार असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार आहे. आतापर्यंत या योजनेसाठी सुमारे 700 अर्ज आले आहेत. दोन रेल्वेमधून (Indian Railways) प्रत्येकी 1 हजार भाविकांना (50 पेक्षा अधिक वय असलेले) देवदर्शनासाठी घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याणमंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन वेगवेगळ्या रेल्वे देवदर्शनासाठी मडगाव (Margao) येथील रेल्वे स्थानकावरून सोडल्या जाणार आहेत. एक रेल्वे मडगाव येथून 100 भाविकांना घेऊन तिरुपती - वालंकिणी, तर दुसरी रेल्वे 1000 भाविकांना घेऊन नाशिक (त्र्यंबकेश्वर) - औरंगाबाद - (ग्रिश्नेश्वर) - शिर्डी - शणी शिग्नापूर येथे जाण्यास निघणार आहे. या दोन्ही रेल्वेमधून जाणाऱ्या भाविकांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) हे झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. हा देवदर्शन दौरा सहा दिवसांचा असणार आहे. या योजनेनुसार अर्जदार स्वतःबरोबर मदतीसाठी 50 वर्षांवरील एका व्यक्तीला घेऊन जाऊ शकतो. हा देवदर्शन दौरा इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनमार्फत (IRCTC) आयोजित करण्यात येणार आहे, असे नाईक म्हणाले.
या योजनेखाली नाशिक व वालंकिणी येथे जाणाऱ्या भाविकांना अर्ज करण्यासाठी सरकारने पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर योजनेची सर्व माहिती देण्यात आली आहे. 50 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असतील. या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असलेल्या लोकांनी सरकारच्या पोर्टलवरून अर्ज डाऊनलोड करून घेऊन किंवा उपजिल्हाधिकारी कार्यालयातून किंवा समाजकल्याण खात्यातून तसेच मडगाव येथील समाजकल्याण खात्यातून जाऊन तो घ्यावा. या देवदर्शन दौऱ्यावेळच्या सर्व खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.
मतांच्या राजकारणाची चर्चा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात सत्तेवर आल्यावर गोमंतकीयांना धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी मोफत यात्रा काढण्यात येईल अशी ग्वाही दिली होती. या घोषणेला काही दिवस झाले असतानाच सरकारने गोमंतकीयांसाठी मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा योजनेची घोषणा केली होती. यापूर्वीही राजकारणी निवडणूक तोंडावर आल्यावर मतदारांची मते मिळवण्यासाठी देवदर्शन सहली आयोजित करत होते. ही योजनाही त्याचा एक प्रयत्न असल्याची चर्चा सध्या आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.