West Zone Hockey Championship 2023
West Zone Hockey Championship 2023

Hockey: मध्य प्रदेशकडून गोव्याचा 23-0 गोलने पराभव, स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

तिसऱ्या सामन्यात हॉकी गुजरातने गोव्याचा 2-1 गोलने पराभव केला.
Published on

West Zone Championship 2023: राजनांदगाव, छत्तीसगड येथे पहिल्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष आणि महिला वेस्ट झोन चॅम्पियनशिप 2023 च्या चौथ्या दिवशी मुलींच्या गटात गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने दादर नगर हवेलीचा 7-0 गोलने पराभव केला.

तर दुसऱ्या सामन्यात मध्य प्रदेशच्या मुलींनी गोव्याचा 23-0 गोलने पराभव करत स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदवला.

तिसऱ्या सामन्यात यजमान छत्तीसगडने एकतर्फी झालेल्या सामन्यात हॉकी गुजरातचा 13-0 गोलने पराभव करत तिसरा विजय नोंदवला. मुलांच्या हॉकी गटात मध्य प्रदेशने दादर नगर हवेलीचा 6-2 गोलने पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात हॉकी महाराष्ट्राने अटीतटीच्या लढतीत राजस्थानचा 2-0 गोलने पराभव केला. रोमहर्षक तिसऱ्या सामन्यात हॉकी गुजरातने गोव्याचा 2-1 गोलने पराभव केला.

सामन्याला सुरुवात होताच मध्य प्रदेशच्या मुलींनी गोव्यावर एकामागून एक गोल नोंदवण्यास सुरुवात केली आणि सामना संपेपर्यंत त्यांना 23-0 गोलने विजय मिळवता आला, जो स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा फरक आहे. सामनावीर ठरलेल्या रुबी राठौरने 5, कनक पाल आणि शालू पुक्रंबनने प्रत्येकी 3 गोल केले.

एकतर्फी झालेल्या सामन्यात हॉकी महाराष्ट्र संघाने दादर नगर हवेली व दमण दिव संघाचा 7-0 गोलने पराभव केला. हॉकी महाराष्ट्रासाठी कर्णधार यशस्वी प्रकाश कुबडेने 4, अन्वी रावतने 1 गोल केला. श्रेया अभिजीतने 1 तर तलिशा वाझने 1 गोल केला.

तिसऱ्या सामन्यात यजमान छत्तीसगडने गुजरातचा 0 विरुद्ध 13 गोलने सहज पराभव केला. यजमान मुलींच्या छत्तीसगड संघाचा हा तिसरा विजय ठरला. छत्तीसगडसाठी मधु सिदारने 5, प्रियाशी मौर्याने 3, धनेश्वरी, श्यामली रॉय, नैना, आराधना राजभरने प्रत्येकी 1 गोल केला.

दुपारी खेळल्या गेलेल्या मुलांच्या गटात तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात मध्य प्रदेशने दादर नगर हवेली दमण आणि दिव संघाचा 2 विरुद्ध 6 गोलने सहज पराभव केला. मध्य प्रदेशकडून आदिल खानने 3, जावेद खानने 2 आणि ऋषी मौर्याने 1 गोल केला. दादर नगर हवेलीतर्फे पवन यादव आणि आकाश यादव यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com