'भारताने गोव्याची केलेली मुक्तता उच्चवर्णीय हिंदू राज्याने ख्रिश्चनांविरुद्ध केलेले युद्ध होते'; लेखिका अरुंधती रॉय

Writer Arundhati Roy Controversy: नेटिझन्सनी रॉय यांच्यावर इतिहासाचे विकृतीकरण करत असल्याची टीका करत त्यांना राष्ट्रविरोधी म्हटले आहे.
Upper caste Hindus vs Christians Goa | Arundhati Roy statement
Arundhati Roy on Goa liberationDainik Gomantak
Published on
Updated on

प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. स्वातंत्र्यापासून भारताने आपल्याच नागरिकांविरुद्ध 'युद्ध' सुरू केल्याच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका होत आहे. लोकशाही प्रधान भारताने उच्चवर्णीय हिंदू राज्य म्हणून, स्वतःच्याच लोकांविरुद्ध युद्ध छेडले. पण, पाकिस्तानने असे कधीही केले नाही, असे म्हणत रॉय यांनी काश्मीर, मणिपूर, नागालँड, मिझोराम, तेलंगणा, पंजाब, गोवा आणि हैदराबाद राज्यांचा उल्लेख केला.

नेटिझन्सनी लेखिका अरुंधती रॉय यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला आहे. नेटिझन्सनी रॉय यांच्यावर इतिहासाचे विकृतीकरण करत असल्याची टीका करत त्यांना राष्ट्रविरोधी म्हटले. लेखक आनंद रंगनाथन यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर अरुंधती रॉय यांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Upper caste Hindus vs Christians Goa | Arundhati Roy statement
Monsoon Withdrawal: अच्छा तो हम चलते हैं! मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु; गोव्यात तीन दिवस यलो अलर्ट

अरुंधती रॉय यांच्या मते १९६१ मध्ये भारताने केलेली गोव्याची मुक्तता ही प्रत्यक्षात उच्च जातीच्या हिंदू राज्याने ख्रिश्चनांविरुद्ध केलेले युद्ध होते, असे लिहून रंगनाथन यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. रंगनाथन यांच्या पोस्टला हजारो व्ह्यूज मिळाले अनेकांनी पोस्ट ती पुन्हा पोस्ट केलीय.

"भारताविरुद्ध विष ओकणे, तथ्यांचे विकृतीकरण करणे आणि हिंदूंना खलनायक बनवण्याचा प्रयत्न आहे. तर पाकिस्तानच्या रक्तरंजित इतिहासाला स्वच्छ केलं जातंय. पाकिस्तानने स्वतःच्या लोकांविरुद्ध सैन्य पाठवले नाही असा दावा करणं हास्यास्पद आहे," अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे.

भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी देखील आनंद रंगनाथन यांची पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. कंवल सिब्बल यांनी अरुंधती रॉय यांच्या वक्तव्याचा निषेध करताना "हिंदूविरोधी" म्हटले.

सिब्बल यांनी अरुंधती रॉय यांना पाकिस्तानात सुरु असलेल्या विविध लष्करी कारवायांचा संदर्भ दिला. २०१४ चे ऑपरेशन झर्ब-ए-अज्ब (उत्तर वझिरिस्तानमध्ये), २००९ चे ऑपरेशन राहत-ए-निजात (दक्षिण वझिरिस्तानमध्ये), २००६ मध्ये मुशर्रफ यांनी बलुच बंडखोरांविरुद्ध केलेली मोहीम यात नवाब अकबर बुगतींवर तोफखाना गोळीबार करण्यात आला होता आणि २०२४ मध्ये सुरू असलेले ऑपरेशन आझम-ए-इस्तिहकम, अशी माहिती सिब्बल यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com