Goa Fraud Case: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 18 जणांना 31 लाखांचा गंडा; कुडतरी, सासष्टीतील दोघांविरोधात गुन्हा

Goa Fraud Case: आगशी पोलिसांनी संशयित जास डिकॉस्ता आणि ज्वेन्सी डायस या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.
Goa Fraud Case
Goa Fraud CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fraud Case

सरकारी खात्यात नोकरीचे आमिष दाखवून 18 जणांना 31 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आगशी पोलिसांनी सासष्टी, कुडतरीतील दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आगशी पोलिसांनी संशयित जास डिकॉस्ता आणि ज्वेन्सी डायस या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी सरकारे खात्यात नोकरी देतो असे आमिष देऊन 18 जणांकडून सुमारे 31 लाख रुपये घेतल्याची तक्रार आगशी पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास सुरु आहे.

केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली 1.20 लाखांची फसवणूक

बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली खातेदाराला एक लाख वीस हजार रुपयांचा गंडा घातला. संशयिताने तो अॅक्सिस बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून खातेदाराला विश्वासात घेत केवायसीच्या नावाखाली फसवणूक केली.

याप्रकरणी ओल्ड पोलिसांनी संदीप शर्मा याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com