Vasco News: नैसर्गिक की घातपात? चिकोळणा- बोगमाळो येथे चार दिवसात 18 गाई, एक म्हैस मृत

20 दिवसापूर्वी याच पंचायत क्षेत्रात 20 पाळीव डूक्कर मृत अवस्थेत सापडल्याचे सरपंच महाले यांनी सांगितले.
Vasco News
Vasco NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Vasco News: एका धक्कादायक आणि विचित्र घटनेत, चिकोळणा- बोगमाळो पंचायत क्षेत्रात गेल्या चार दिवसात सुमारे 18 गाई आणि एक म्हैस मृतावस्थेत सापडल्याने पंचायत क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

गैरप्रकार झाल्याचा संशय असून या प्रकरणाची तक्रार वास्को पोलिसांकडे (Vasco Police) केली आहे. तसेच मृत गायींची डीएनए तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहे.

Vasco News
Goa Drug Case: वाळपईत अंमली पदार्थ प्रकरणी तिघांना अटक

चिकोळणा बोगमाळो पंचायतीचे सरपंच संकल्प महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पंचायत क्षेत्रात गेले चार दिवस म्हणजेच शूक्रवार पासून गाई मृतावस्थेत सापडल्याच्या घटना घडल्या.

त्याचा आजपर्यंत आकडा 18 वर गेल्याने पंचायतीने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन जनावरांच्या तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करून त्यांचे नमुने गोळा केले.

डॉक्टरांच्या माहितीनुसार आज मृतावस्थेत सापडलेली गाय शॉक लागल्याने मृत पावल्याची सांगण्यात आले. तरी या अधिकाऱ्यांनी काही गैरप्रकार असल्याचा संशय व्यक्त करून या प्रकरणाची तक्रार वास्को पोलिसांकडे करण्याचा सल्ला पंचायतीला दिला.

त्यानुसार वास्को पोलिस स्थानकात या प्रकरणी तक्रार करण्यात आल्याचे सरपंच संकल्प महाले यांनी सांगितले.

Vasco News
Calangute Drug Case: अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नायजेरीयन नागरिकाला अटक, कळंगुट पोलिसांची कारवाई

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला. तसेच पुढील तपास चालू असल्याचे म्हणाले. तसेच जोपर्यन्त अहवाल येत नाही तो पर्यंत गाई दगावण्याचे कारण समजणार नसल्याचे ते म्हणाले

दरम्यान, 20 दिवसापूर्वी याच पंचायत क्षेत्रात 20 पाळीव डूक्कर मृत अवस्थेत सापडल्याचे सरपंच महाले यांनी सांगितले. आता गाई मृतावस्थेत सापडल्याने संशय बळावला असल्याचे महाले यांनी सांगितले.

त्यांनी चिकोळणा कोमुनिदाद यांना गोशाळा बांधण्यासाठी जमिनीची मागणी केली असल्याचेही संकपंच महाले यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com