पिसुर्ले: राज्यातील सर्व स्तरावरील घटकांना कोव्हीड प्रतिबंध लसीकरणाचा लाभ मिळवून राज्यात 100 टक्के लसीकरण पुर्ण व्हावे या हेतूने सुरवातीला तालुका व पंचायत पातळीवर लसीकरण मोहीम राबवून आता ग्रामीण भागातील बुथ पातळीवर सदर योजना राबविण्याची संकल्पना आणून सुरु केलेल्या लसीकरण मोहीमे अंतर्गत भुईपाल येथिल मतदान केंद्रावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे 179 जणांनी लसीकरण करून घेतले. (179 people took advantage of the vaccination in Goa)
राज्यातील आरोग्य खात्याच्या माध्यमातून सदर लसीकरणाची व्यवस्था जवळपास केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून सरकार नागरिकांच्या आरोग्या बाबतीत खरंच गंभीर असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, सदर शिबिरा मुळे तालुका पातळीवरील असलेल्या सामाजिक आरोग्य केंद्रात जाऊ न शकलेल्या नागरिकांना याचा लाभ झाला. सदर योजनेचा लाभ सर्व घटकांना व्हावा या अनुषंगाने पंचायत पातळीवरून बरीच जनजागृती केली होती, त्याच प्रमाणे तालुका मामलेदार कार्यालयाच्या वतीने बुथ पातळीवरील अधिकाऱ्यांना यांची जबाबदारी देऊन मतदार यादी नुसार नागरिका पर्यंत पोहचून लसीकरण करून घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले होते. त्यानुसार भुईपाल येथिल बुथ पातळीवरील अधिकारी धाकु पावणे, पंच सया पावणे यांनी प्रयत्न करून नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.