
Swarayadnya Goa 2024
स्वस्तिक-पणजी आणि श्री केलंबिका कलामंच-मुळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणारी ‘स्वरयज्ञ’ ही रियाजाची १६ वी वार्षिक कार्यशाळा २७, २८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी, साळ-डिचोली येथील ‘राऊत फार्महाऊस’ येथे संपन्न होणार आहे. यंदाच्या ‘स्वरयज्ञ’ची विशेषता म्हणजे त्यात देशातील दिग्गज कलाकार आणि तज्ज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
ज्येष्ठ व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित अजय चक्रवर्ती हे या कार्यशाळेत शिबिरार्थ्यांकडून रियाज करून घेणार आहेत यापेक्षा शिबिरार्थ्यांचे भाग्य ते कुठले असेल? त्याचबरोबर या पुणे येथील प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये तीनही दिवस शिबिरार्थ्यांबरोबर राहणार आहेत.
‘कलाकार आणि आनंदी जीवन’ या विषयावर ते तीन दिवस स्वरसाधकांना मार्गदर्शन करतील. डॉ. दीपक मूर्ती हे प्रसिद्ध कान, नाक व घसा तज्ञ ‘आवाजा’संबंधी विषयांवर शिबिरार्थ्यांना या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. योगासन व प्राणायाम या विषयांवर योग तपस्विनी मेघना दोशी यांचेही मार्गदर्शन शिबिरार्थ्यांना लाभणार आहे. एकंदरच स्वस्तिकची ही कार्यशाळा शिबिरार्थ्यांसाठी, ‘किती घेशील दो करांनी’चा अप्राप्य अनुभव असेल.
ही कार्यशाळा निवासी असून, येण्या-जाण्याचा प्रवास, तेथील निवास, नाश्ता-जेवण आदीची सोय अल्प शुल्क आकारून आयोजक उपलब्ध करून देत असतात. स्वरयज्ञात सहभागी होणार्या शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येते. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी स्वस्तिकच्या संकेत स्थळावर अथवा पणजी येथील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन स्वस्तिकतर्फे करण्यात आले आहे.
शास्त्रीय संगीतात स्वरसाधनेला म्हणजेच रियाजाला अनन्यसाधारण महत्व आहे. याच रियाजाचे महत्व जाणून स्वस्तिक गेली पंधरा वर्षे सलग स्वरयज्ञ ही अनोखी निवासी कार्यशाळा आयोजित करीत असते. या कार्यशाळेत सर्व सहभागी एका विशिष्ठ वेळापत्रकानुसार रियाज करतात. कुठल्याही घराण्याचा गायक किंवा विद्यार्थी या कार्यशाळेत भाग घेऊन रियाज करू शकतो.
शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम संगीत असे विविध प्रकार गाणार्या कोणत्याही कलाकाराला किंवा ज्याला संगीत शिकायचं आहे अशा कुठल्याही विद्यार्थ्याला या कार्यशाळेत सहभागी होता येते. त्याचबरोबर ज्याला नुसता रियाज किंवा व्याख्यान ऐकायचे आहे अशी व्यक्तीसुद्धा या कार्यशाळेत सहभागी होऊ शकते. इथे वयाची मर्यादा नाही. रियाजाचा कानमंत्र देणार्या या कार्यशाळेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांकडून रियाज करून घेण्यात येतो व त्याचबरोबर गायकाला लागणारी शारीरीक तंदुरूस्ती, दीर्घ श्वास, आवाजाशी निगडित आहार, ध्वनी यंत्रणा, तंत्रज्ञान, आवाजाची घ्यायची काळजी व इतर गोष्टीवरही प्रकाश टाकला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.