Covid Booster Dose : डिचोलीत आतापर्यंत 1500 जणांनी घेतला ‘बूस्‍टर’ डोस

गावांमध्‍ये चांगला प्रतिसाद; सरकारी कर्मचाऱ्यांची मात्र अनास्‍था
Government To give free Booster Dose | Covid Vaccination | Booster
Government To give free Booster Dose | Covid Vaccination | Booster Dainik Gomantak
Published on
Updated on

Covid Booster Dose : कोविड प्रतिबंधात्मक ‘बूस्टर डोस’ घेण्यासाठी ग्रामीण भागात समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या 15 जुलैपासून आतापर्यंत डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास दीड हजार नागरिकांनी हा डोस घेतला आहे, अशी माहिती डिचोली आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी दिली. तसेच सरकारी आणि औद्योगिक कर्मचाऱ्यांनी हा डोस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे.

‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारने 15 जुलैपासून 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य केंद्रात डोस देण्याची व्यवस्था केली असतानाच शाळा, औद्योगिक आस्थापने आदी ठिकाणी जाऊन हा डोस देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Government To give free Booster Dose | Covid Vaccination | Booster
Vishwajit Rane : गोव्यात वन प्रकल्पांना केंद्राचा हिरवा कंदील

स्‍वत:च्‍या सुरक्षिततेसाठी बूस्‍टर डोस घ्‍यायला पुढे या : साळकर

ग्रामीण भागात ‘बूस्टर डोस’ घेण्यासाठी समाधानकारक प्रतिसाद मिळत असला तरी सरकारी तसेच औद्योगिक कर्मचारी हा डोस घेण्यासाठी अजूनही पुढे येत नाहीत. फ्रंटलाईन वर्कर्समध्येही अनास्था दिसून येत असल्याची खंत डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी व्‍यक्त करून भविष्यातील सुरक्षितेसाठी बूस्टर डोस घेण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन केले. ज्यांना हा डोस घ्यायचा असेल त्यांनी आरोग्य केंद्राशी संपर्क साधल्‍यास त्यांना डोस उपलब्ध करण्याची व्यवस्थाही करण्यात येईल, असेही डॉ. साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Cutbona jetty sanitation issues Goa
Mapusa Market Nullah Cleaning
Goa Assembly Elections 2027
Goa Human Trafficking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com