Goa Electricity: राज्‍यात 2027 पर्यंत 150 मेगावॅट वीजनिर्मिती; सुदिन ढवळीकर

Goa Electricity: साळगावात अत्याधुनिक वीजउपकेंद्राची पायाभरणी
Goa Electricity Issue
Goa Electricity Issue Dainik Gomantak

Goa Electricity: गोव्याला वीजेसाठी शेजारील राज्यांवर अवंलबून रहावे लागत असले तरी 2027 पर्यंत गोवा राज्य 150 मेगावॅट वीजनिर्मिती करेल. यासंदर्भात सामंजस्य करार केला असून सरकार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कटिबद्ध आहे.

Goa Electricity Issue
Goa BJP: ध्वजारोहणावरून काँग्रेसचा भाजपवर जोरदार पलटवार!

पर्यटन व नवीन उद्योग क्षेत्रांचा भविष्यातील विस्तार लक्षात घेत सरकारने वीजनिर्मितीवर भर देण्यासाठी पावले उचलली आहेत, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

साळगाव येथे नवीन जीआयएस अत्याधुनिक उपकेंद्राची पायाभरणी आणि पर्वरीत ओव्हरहेड एलटी नेटवर्कचे भूमिगत पद्धतीमध्ये रुपांतरण करण्याच्या कामाच्या कार्यक्रमास्थळी ढवळीकर बोलत होते.

यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, उपसभापती जोशुआ डिसोझा, मत्‍स्‍योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार मायकल लोबो, अ‍ॅड. कार्लुस फेरेरा, दिलायला लोबो, केदार नाईक, मुख्य वीज अभियंता राजू सामंत, म्हापसा नगराध्यक्षा प्रिया मिशाळ व परिसरातील ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मायकल लोबो म्हणाले की, मागील दहा वर्षे किनारी भागातील लोक या नवीन उपकेंद्राची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. या उपकेंद्रामुळे खंडित विजेची समस्या दूर होईल.

साळगावमधील या नवीन वीजउपकेंद्रामुळे उत्तर गोवा विशेषतः किनारी भागातील वीजसमस्येचा प्रश्‍‍न सुटण्यास मदत होईल आणि चोवीस तास अखंडित वीजपुरवठा मिळेल. या उपकेंद्रासाठी 334 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

- राजू सामंत, वीज अभियंता

येणाऱ्या काळात वीजेचे दर वाढू शकतात. सर्वत्र भूमिगत वीजवाहिन्यांची कामे सुरू आहेत. वीज खात्यातर्फे आज पर्वरी व साळगावात मिळून एकूण 450 कोटींच्‍या कामांची पायाभरणी करण्‍यात आली. राज्‍यात आतापर्यंत 60 कोटींची कामे पूर्णत्वास नेली आहेत.

- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com