Special Trains To Goa: नाताळ, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणाऱ्यांसाठी खूशखबर; मुंबईतून धावणार 14 स्पेशल ट्रेन

22 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान या विशेष गाड्या धावतील.
14 Special Trains From Mumbai To Goa On X'mas And New Year
14 Special Trains From Mumbai To Goa On X'mas And New YearDainik Gomantak
Published on
Updated on

14 Special Trains From Mumbai To Goa On X'mas And New Year: नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात येणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ऐनवेळी गाडी आणि तिकीटाचा प्रश्न सोडवण्यासाठी मध्य रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मध्ये रेल्वेने या काळात गोव्यासाठी 14 ख्रिसमस आणि न्यू इयर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 22 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान या विशेष गाड्या धावतील.

दरवर्षी मुंबईतील शेकडो लोक नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येत असतात. डिसेंबर महिन्यात देशाच्या विविध भागातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. पण, ऐनवेळी रेल्वे आणि विमान तिकीट न मिळाल्याने निराशा होते. किंवा तिकिटासाठी अधिक पैसे मोजावे लागतात.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने ख्रिसमसच्या 10 दिवस आधी 14 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

असे आहे वेळापत्रक

पनवेल-मडगाव-पनवेल दरम्यान 12 विशेष गाड्या चालवणार आहे. गाडी क्रमांक 01427 (06 फेऱ्या) पनवेल-मडगाव ही गाडी 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पनवेलहून 21.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6.50 वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

तसेच गाडी क्रमांक 01428 (06 फेऱ्या) मडगाव-पनवेल ही मडगाव जंक्शन येथून 22 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री 8.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20.15 वाजता पनवेलला पोहोचेल.

नवीन वर्षात गोव्यातून मुंबईत परत येण्यासाठी दोन गाड्याही चालवण्यात येणार आहेत. 01430 मडगाव-पनवेल ट्रेन 1 जानेवारी 2024 रोजी मडगाव जंक्शनवरून 21:00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 07.20 वाजता पनवेलला पोहोचेल. या गाड्यांना 22 डबे असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com