Goa News: सत्तरीत भीषण आगीची दुर्घटना, अंजनी तिव्रेकर यांच्या घराचे 7 लाखांहून अधिक नुकसान

Today's Goa Marathi Breaking News: राजकारण, क्रीडा, मनोरंजन यासोबत जाणून घ्या गोव्यातील ताज्या आणि ठळक घडामोडी मराठीमध्ये.
Marathi Breaking News
Marathi Breaking NewsDainik Gomantak
Published on
Updated on

सत्तरीत भीषण आगीची दुर्घटना, अंजनी तिव्रेकर यांच्या घराचे 7 लाखांहून अधिक नुकसान

वांते सत्तरी येथील प्रिळ्येकर वाडा परिसरात श्रीमती अंजनी तिव्रेकर (गावडे) यांच्या घराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीत तिव्रेकर कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार, ही नूकसानी 7 लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती आहे.

Colva: कोलवा चोरीप्रकरणी संशयिताला जामीन

कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत दागिन्यांच्या चोरी प्रकरणी अटक केलेला पापू पाली या संशियताला मडगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्‍याने चोरीचे दागिने उत्तर प्रदेशातील एका सोनाराला विकल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कोलवा पोलिसांनी त्‍याला अटक केली होती.

Goa Crime: कुंकळ्‍ळी येथून मुलाचे अपहरण

तलवाडा-कुंकळ्‍ळी येथून आणखी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अपहरण करण्यात आलेल्या मुलाच्या वडिलांनी कुंकळ्ळी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, माजोर्डा येथील ‘त्‍या’ तीन अल्पवयीन मुलांचा अजून तपास लागलेला नाही. या प्रकरणी भारतीय न्यायदंड संहिता आणि गोवा बालहक्क कायद्याच्‍या विविध कलमांखाली गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास सुरू आहे.

Accident: कुठ्ठाळी अपघातात स्कूटरस्वार जखमी

सत्रांत-कुठ्ठाळी येथील वालंकिणी चॅपेलजवळ बुधवारी रात्री सुमारे पावणेबाराच्या दरम्यान झालेल्या अपघातात दोन स्कूटरस्वार जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. वेर्णा पोलिसांनी प्रदीप पिल्लई (कुठ्ठाळी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप हा बुधवारी रात्री सत्रांत येथील ‘स्नॅक फास्ट फूड’ येथून कुठ्ठाळी चौकाकडे आपल्या स्कूटरने निघाला होता. योग्य खबरदारी न घेता त्याने महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणारी स्कूटर पाहून त्याचा स्वतःच्या स्कूटरवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याची स्कूटर समोरून येणाऱ्या स्कूटरवर आपटली. यामुळे पिल्लई व दुसरा स्कूटरस्वार हर्षित व्दिवेदी (ठाणे - महाराष्ट्र) हे रस्त्यावर पडले. त्यामुळे दोघांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. या अपघात प्रकरणी वेर्णा पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक परेश फळदेसाई पुढील तपास करीत आहेत.

Valpoi: वाळपई येथील ब्रह्मदेव देवस्थानात चोरीप्रकरणी शिक्षा

सत्तरी येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयाने ब्रह्मकरमळी-वाळपई येथील श्री ब्रह्मदेव देवस्थानातील चोरीप्रकरणी आरोपी विशाल झर्मेकर (नानोडा) याला एका वर्षाच्या सक्तमजुरीच्या शिक्षेसोबत दंडाची शिक्षा सुनावली. संशयिताने न्यायालयात गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अतिशय जलदगतीने हा निकाल देण्यात आला. २७ मे २०२५ च्या रात्री चोरट्याने देवस्थानातील गर्भकुडीसमोरील देणगी पेटीचे कुलूप तोडून सुमारे ३० हजारांची रक्कम लंपास केली होती.

Pooja Naik Job Scam: नोकरी घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा सहभाग नाही - पूजा नाईक

नोकरी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री सहभागी नव्हते. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मला आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्याशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आणि मी त्या दोघांनाही पैसे दिले, असं पूजा नाईक हिने स्पष्ट केलं आहे.

Calangute: कळंगुटमधील बागा समुद्रकिनारी महिलेचा विनयभंग; संशयितास अटक

कळंगुटमधील बागा समुद्रकिनारी फिरणाऱ्या महिला पर्यटकास विनाकारण अश्लील शिविगाळ करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी अतेद्रा सिंग (२३) मूळ राजस्थान याला रितसर अटक केली. अतेद्रा सिंग हा बागा येथे एका खासगी रेस्टॉरंटमध्ये कामाला होता. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने ड्युटीवरील पर्यटक पोलिस शिपायाने अतेद्रा सिंग याला रंगेहाथ पकडले. संशयित कळंगुट पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, परप्रांतीय दलाल तसेच टाऊट्‌समुळे गोव्याची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत असून पर्यटनाला काळा डाग लागतो आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सांगितले आहे.

Ponda: फोंडा नगराध्यक्षपदी विरेंद्र ढवळीकर यांची बिनविरोध निवड

फोंडा नगराध्यक्षपदी विरेंद्र ढवळीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आनंद नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त होते. सर्वाना बरोबर घेऊन विकास करणार असल्याचे विरेंद्र ढवळीकर यांनी सांगितले.

Ponda: तिस्क-उसगावात दोन दुकानांत चोरी

तिस्क-उसगाव येथील दोन दुकानांत बुधवारी रात्री चोरट्यांनी चोरी करून सुमारे दहा हजारांची रोकड पळवली. चोरट्यांनी दुकानाच्या वरती असलेली कौले काढून आत प्रवेश केला व ड्रॉवर फोडून आतील रोकड लंपास केली. सकाळी दुकानमालक दुकान उघडण्यासाठी आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. फोंडा पोलिसांना या चोरीची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.

Margao: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरण ,क्राईम ब्रँचकडून ‘फुटेज’ची मागणी

मडगाव पोलिस कोठडीत मारहाण करण्यात आलेल्या एडबर्ग परेरा याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या क्राईम ब्रँचने दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे त्या दिवशी कोठडीत काय झाले ते जाणून घेण्यासाठी ‘सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज’ मागितली आहे. ही फुटेज क्राईम ब्रँचकडे सुपुर्द केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. एडबर्ग परेरा याला मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असता तिथे त्याला मारहाण झाल्याने गंभीर अवस्थेत गोमेकोत दाखल केले होते. हे प्रकरण सध्या तपासासाठी क्राइम ब्रँचकडे दिले आहे.

Bihar Election Result: बिहारमध्ये NDA आघाडीवर, मैथिली ठाकूर पिछाडीवर

बिहारमध्ये झालेल्या ऐतिहासिक आणि अत्यंत चुरशीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी ८ वाजता सुरू झाली असून प्रारंभीच्या कलांमधून एनडीएला स्पष्ट आघाडी मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्याच्या कलांनूसार मैथिली ठाकूर पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.

Accident: दुचाकीच्या धडकेत पादचारी जागीच ठार

मडकई येथे मुख्य रस्त्यावर आज गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका दुचाकीची जोरदार ठोकर बसल्याने रस्ता ओलांडणारी व्यक्ती ठार झाली. त्याचे नाव कृष्णा गावडे (वय ५६) असे असून तो गावणे - मडकई येथील रहिवासी आहे. मडकई आरोग्य केंद्रासमोरच हा अपघात झाला. तो एका खासगी बसवर वाहक म्हणून कामाला होता. घरी परतत असताना त्याला दुचाकीची जोरदार ठोकर बसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com