पणजी : पत्रादेवी - पेडणे चेकनाक्यावर आज सीआयडी क्राईम ब्रँचच्या पथकाने गुजरात नोंदणी असलेल्या ट्रकातून सुमारे 14 लाखांची बेकायदा दारू जप्त केली. ही कारवाई आज पहाटे सहाच्या सुमारास केली. ट्रकचा चालक नुरूल होडा खान (33वर्षे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेला मद्यसाठा व चालकाला अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईसाठी सोपवण्यात आले आहे अशी माहिती क्राईम ब्रँचचे निरीक्षक चिमुलकर यांनी दिली.
क्राईम ब्रँच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रकमधून किंगफिशर स्ट्राँग प्रिमियम बियरचे 237 बॉक्सेस, रॉयल ब्लॅक ऑरेंज वोडकाचे 199 बॉक्सेस, बॉम्बे रॉयल व्हिस्कीचे 149 बॉक्सेस तसेच ग्रीन ॲपल वोडका 104 बॉक्सेस जप्त करण्यात आले आहेत.
गोव्यातून हा मद्यसाठा वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेला अबकारी खात्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता. हा मद्यसाठा गुजरातमधील एका व्यापाऱ्याने गोव्यातून आणण्यासाठी चालकाला पाठवले होते. पहाटेच्या सुमारास हा मद्यसाठा भरलेला ट्रक घेऊन गोव्यातून पलायन करण्याचा बेत होतो मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे फसला.
पोलिसांनी चालक नुरूल खान याची चौकशी केली असता तो उत्तरप्रदेश येथील असून गुजरातमध्ये एका ट्रक कंपनीकडे चालक म्हणून कामाला आहे. त्याला मालकाने गोव्यातून मद्यसाठा आणण्यास पाठवले होते. या मद्यासाठा आणण्यासाठी मालकाने परवाना घेतला आहे की नाही याची माहिती नाही. त्याच्याकडे पोलिसांना अबकारी खात्याचा परवाना मागितला असता त्याच्याकडे नसल्याचे सांगितल्याने ही कारवाई करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.