Goa Fraud Case: गोमंतकीयांना 130 कोटींचा गंडा घालणाऱ्या मायरनविरोधात ईडी अ‍ॅक्शनमोडमध्ये! ‘ब्ल्यू कॉर्नर’ साठी हालचाली सुरु
Enforcement Directorate Dainik Gomantak

130 कोटींचा गंडा घालणाऱ्या मायरनविरोधात ED 'ब्ल्यू कॉर्नर' नोटीस जारी करणार? हालचालींना वेग

ED Investigation: सुमारे १३० कोटींच्या कथित शेअर मार्केट घोटाळ्याची चौकशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीअंतर्गत सुरू केली आहे.
Published on

पणजी: सुमारे १३० कोटींच्या कथित शेअर मार्केट घोटाळ्याची चौकशी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीअंतर्गत सुरू केली आहे.

याप्रकरणी मायरन रॉड्रिग्ज व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तीन मालमत्ता तसेच बँकेमधील सुमारे ३ कोटींची ठेव रक्कम जप्त केली आहे. मुख्य सूत्रधार मायरन हा लंडन येथे असल्याने त्याच्या अटकेसाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती ईडी सूत्राने दिली.

Goa Fraud Case: गोमंतकीयांना 130 कोटींचा गंडा घालणाऱ्या मायरनविरोधात ईडी अ‍ॅक्शनमोडमध्ये! ‘ब्ल्यू कॉर्नर’ साठी हालचाली सुरु
Goa Fraud Case: गोमंतकीयांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या मायरन रॉड्रिग्जच्या पहिल्या पत्नीला अटक

संशयित मायरन रॉड्रिग्ज व त्याची पत्नी दिपाली परब यांनी सासष्टीतील अनेक लोकांना गुंतवणुकीवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींना गंडा घातला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे कक्षाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

Goa Fraud Case: गोमंतकीयांना 130 कोटींचा गंडा घालणाऱ्या मायरनविरोधात ईडी अ‍ॅक्शनमोडमध्ये! ‘ब्ल्यू कॉर्नर’ साठी हालचाली सुरु
Goa Fraud Case: छानछोकी अन् ब्‍युटी पेजंटच्‍या आकर्षणात 'तन्वी'ने उडवले पैसे; कोट्यवधी रुपयांबाबत पोलिस तपास सुरु!

चौकशीसाठी संशयित मायरन याची घटस्फोटीत पत्नी सुनिता रॉड्रिग्ज हिला गुन्हे शाखेने बोलावले होते. मात्र, ती सहकार्य करत नसल्याने तिला अटक करण्यात आली होती. या घोटाळ्यात सुरवातीच्या काळात ती सुद्धा संशयित मायरनला मदत करत होती व ती सुद्धा त्यात गुंतली होती. लोकांना गुंतवणूक (Investment) करण्यास लावून संशयितांनी त्या रकमेचा वापर स्वतःसाठी केला होता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com