Margao Municipal Council : मडगाव पालिकेतील 129 पदे भरतीविना रद्द

भरती प्रक्रियेत उदासीनता : नगराध्यक्षांकडून संताप
Margao Municipal Council
Margao Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

Margao : रिक्त झालेली पदे भरून काढण्यासाठी वेळीच प्रक्रिया सुरू न केल्याने मडगाव पालिकेतील तब्बल 129 पदे रद्द झाली आहेत. यावर नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

गेल्‍या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्‍यांतील 13 रिक्‍त पदे मार्चपर्यंत भरणे आवश्‍‍यक होते. मात्र, प्रशासकीय विभागाकडून बेफिकीरपणा चालू आहे. आत्तापर्यंत अशा प्रकारामुळे तब्‍बल 129 पदे रद्दबातल झाली आहेत.

वरिष्‍ठ कारकून हा सगळा घोळ घालत असल्‍याचे दिसून आल्‍याने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नगराध्‍यक्ष दामाेदर शिरोडकर यांनी यासंदर्भात तीव्र संताप व्‍यक्‍त केला आणि घोळ घालणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आठ दिवसांच्‍या आत सर्व रद्द झालेल्‍या पदांसंदर्भातील माहिती आपल्‍यासमोर ठेवण्‍याचे निर्देश नगराध्‍यक्षांनी हा घोळ घालणाऱ्या कारकुनाला दिले आहेत. त्‍या कारकुनाला ‘मेमो’ देण्‍याचे निर्देशही प्रशासकीय अधिकारी अभय राणे यांना दिले आहेत.

Margao Municipal Council
Margao Municipal Council: मडगाव पालिकेच्या ड्रॉवरमधून दिवसाढवळ्या गायब झाली इतकी रक्कम; सीसीटीव्ही कॅमेराही बंद

मुख्याधिकाऱ्यांना निर्देश

मुख्‍याधिकारी मानुएल बार्रेटो यांना नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनी लक्ष घालण्‍याचे निर्देश दिले आहेत. जी पदे रद्द झाली आहेत त्‍यांची संपूर्ण यादी सविस्‍तर माहितीसह आपणास सोमवारपर्यंत देण्‍याचे निर्देश या महिला कारकुनाला देण्‍यात आले आहेत. ही यादी माहितीसह पालिका संचालकांना सादर करून ही पदे पुन्‍हा भरण्‍यासाठी परवानगी घेण्‍यात येईल, असे नगराध्‍यक्ष शिरोडकर यांनी सांगितले.

‘बेफिकीरपणा खपवून घेणार नाही’

मुख्‍य कारकून, कनिष्‍ठ कारकून, वरिष्‍ठ कारकून, शिपाई, कामगार, मार्केट निरीक्षक अशी विविध स्‍वरूपातील 116 पदे रद्द झाल्याने नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनी मुख्‍याधिकाऱ्यांना हे का व कसे झाले यासंदर्भात अहवाल सादर करण्‍यास सांगितले होते. त्यानंतरही जानेवारी आणि फेब्रुवारीत आणखी 13 पदे रद्द झाल्‍याने नगराध्‍यक्ष शिरोडकर खूपच भडकले आहेत. अशाप्रकारचा बेफिकीरपणा आपण यापुढे खपवून घेणार नसल्‍याचे त्‍यांनी प्रशासकीय विभागाला बजावले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com