Harmal Panchayat: सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून उभारलेली 125 बेकायदेशीर बांधकामे पाडली जाणार; हरमल पंचायतीचा ठराव

Harmal Panchayat: हरमल किनाऱ्यावर सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून उभारलेली १२५ बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचा ठराव पंचायतीने घेतला आहे.
Harmal Panchayat: सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून उभारलेली 125 बेकायदेशीर बांधकामे पाडली जाणार; हरमल पंचायतीचा ठराव

Harmal Panchayat: हरमल किनाऱ्यावर सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून उभारलेली १२५ बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचा ठराव पंचायतीने घेतला आहे. या १२५ पैकी ८८ बांधकामांना नोटीस जारी केल्याची माहिती हरमल पंचायतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आज दिली. आता याप्रकरणी २४ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्‍यान, हरमलचे माजी सरपंच बेर्नार्ड फर्नांडिस यांची दहा बेकायदा बांधकामे अलीकडेच जमीनदोस्‍त करण्‍यात आली आहेत. हरमल येथील बेकायदेशीर बांधकामांबाबत आज सोमवारी सुनावणी झाली. यावेळी हरमल पंचायतीने प्रतिज्ञापत्राद्वारे वरील माहिती न्यायालयाला दिली. १२५ पैकी ८८ बांधकामांना नोटीस जारी केली आहे तर उर्वरित बांधकामांना पुढील दहा दिवसांत नोटीस जारी केली जाईल, असे पंचायतीने नमूद केले आहे.

याबाबत ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जमीनदोस्‍त केलेल्‍या बांधकामांचा मलबा लवकरच त्या जागेवरून काढण्यात येईल असे संबंधितांनी न्यायालयाला सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com