Panaji News : उत्तर गोव्यात गेल्‍या १० वर्षांत १२०० प्रकल्‍प केले मंजूर : श्रीपाद नाईक

Panaji News : बहुतांश प्रकल्‍पांचे काम मार्गी; कामकाज अहवाल देणारी पुस्‍तिका प्रकाशित
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, उत्तर गोव्यातील जनतेने तब्बल पाच वेळा मला निवडून दिले आणि यातील तीन कार्यकाळ सत्ताधारी गोटात राहून काम करण्याची संधी मिळाली. यातील गेल्या दहा वर्षांत सुमारे बाराशेच्या आसपास प्रकल्प मंजूर करून घेतले.

त्यातील एक हजार शंभरपेक्षा अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. उर्वरित शंभरच्या आसपास प्रकल्पांचे काम सुरू असून ते पुढील सहा-सात महिन्यांत पूर्ण होईल, असा विश्‍‍वास भाजपचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.

Panaji
Goa ECI: गोव्यात दारू, ड्रग्ज, पैसा, भेटवस्तूंची खैरात; निवडणूक आयोगाकडून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

खासदार या नात्याने श्रीपाद नाईक यांनी २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्‍या कार्यकाळात केलेल्या कामाची माहिती देणारा अहवाल ‘सारथी’ या पुस्तिकेच्या माध्यमातून आज प्रकाशित करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस दामू नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.

राज्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांत २० वेलनेस सेंटर्स उभारण्यात आली आहेत, जेथे १४० डॉक्टर कार्यरत आहेत. पर्यटन खात्याच्‍या मंत्रिपदी असताना ताळगाव येथे वॉटर स्पोर्टस्‌ संस्था उभारण्यात आली, जेथे तीन जलक्रीडा आणि पर्यटनाशी संबंधित असे तीन महिन्यांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. जहाजोद्योग खाते असताना मुरगाव बंदर येथे दोन जेटी तसेच क्रुझ पर्यटनाला चालना देण्यात आली, अशी माहिती नाईक यांनी दिली.

९१ सामाजिक सभागृहे, ७२ स्मशानभूमी

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारित येणारे आमदार, नगरसेवक, पंचसदस्य यांच्या सहकार्यानेच शहर आणि गावागावांत अनेक प्रकारचे प्रकल्प राबवणे शक्य झाले.

यात ९१ सामाजिक सभागृह, ७२ स्मशानभूमी, शैक्षणिक संस्थांसाठी वर्ग, सभागृह, प्रयोगशाळा, वाचनालयासाठी पुस्तके, बससेवा आदींचा समावेश आहे. उत्तर गोव्यातील प्रत्येक शाळेत कोणत्या ना कोणत्या रुपात खासदार निधीचा वापर झालेला आहे, असे नाईक यांनी सांगितले.

देशभरात १०२ आयुष इस्पितळांसाठी उपलब्‍ध केला निधी

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात नागरी उड्डाणमंत्री असताना मोपा विमानतळाच्या प्रस्तावाचे काम सुरू झाले होते. मध्यंतरी काँग्रेस सरकारच्या काळात रखडलेले हे काम २०१४ मध्ये पुन्हा सुरू झाले. मोदी सरकारच्या काळात आयुषमंत्री असताना देशभरात १०२ इस्पितळे उभारण्यासी निधी उपलब्ध करून दिला.

गोव्यातही धारगळ येथील भव्य प्रकल्पासह मोतीडोंगर येथे इस्पितळ उभारण्याचे काम सुरू आहे. रायबंदर येथे ‘आयुष’अंतर्गत सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत, असे नाईक म्‍हणाले.

ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडियाचा प्रश्‍‍न आता केंद्र सरकारने निकाली काढला आहे. पारपत्र समर्पण केल्याची पावती ओसीआय दर्जा कायम ठेवण्यासाठी पुरेशी ठरणार असल्याची अधिसूचना जारी करण्यात आलीय. यामुळे गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे. यासाठी केंद्राचे आभार मानतो.

श्रीपाद नाईक, भाजप उमेदवार (उत्तर गोवा)

काँग्रेसचे उमेदवार आज

२५ वर्षांनी जागे झाले आहे. यामुळे कुठे विकासकामे झाली आहेत याची त्यांना माहितीच नाही. खासदार या नात्याने खासदार निधीचा वापर करण्यात श्रीपाद नाईक यांचा देशात दहावा क्रमांक लागतो. ॲड. रमाकांत खलप यांनी विनाकारण दुसऱ्यांवर आरोप करू नये.

- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com