Dabolim Airport: दाबोळी फ्लाईट लँडिंग झोन क्षेत्रातील 11 घरे जमीनदोस्त; नौदलाने घेतला होता आक्षेप

Dabolim Airport: मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाने केली कारवाई, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

Dabolim Airport

नौदलाच्या आक्षेपानंतर दाबोळीतील फ्लाईट लँडिंग झोनजवळील ११ अवैध घरे आज एका कारवाईत पाडण्यात आली. ही कारवाई मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाने केली.

गोव्यातील अवैध बांधकामांविरोधात प्रशासनाने सर्वत्र मोठी मोहीम हाती घेतली असून त्यानुसार आज दाबोळीतील ‘फ्लाईट लँडिंग झोन’जवळील ११ घरांवर मुरगाव नियोजन विकास प्राधिकरणाने बुलडोझर फिरवला.

ही घरे गेल्या १० ते १५ वर्षापूर्वीची असून भारतीय नौदलाने (Indian Navy) या घरांच्या बांधकामावर १५ वर्षांपूर्वी आक्षेप घेतला होता हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. कारण ही घरे दाबोळी येथील फ्लाईट लँडिंग झोनजवळ म्हणजेच विमाने उड्डाणाच्या व उतरविण्याच्या क्षेत्राजवळील भागात होती.

आजच्या कारवाईने येथील नागरिकांत भीतीचे सावट पसरले आहे. गेली पंधरा वर्षे आपण या ठिकाणी घर बांधून वास्तव्यास आहे.

Dabolim Airport
Bicholim News : ‘अवरलेडी’च्या विद्यार्थ्यांकडून डिचोलीत कचरामुक्तीचा संकल्प

नौदलाचा आक्षेप होता, तर आम्हाला पंचायतीकडून घर बांधण्यास परवानगी का दिली? नळ, वीजजोडणी का दिली? असे असते तर आम्ही लाखो रुपये कर्ज काढून घर बांधले नसते.

आम्हाला ही नुकसान भरपाई कोण देणार? रात्रीचे दिवस करून मोलमजुरी करून आम्ही घरे उभी केली ते आम्ही आता मोडताना आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत अशी दुःखद प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Illegal Petroleum Storage
Ghrdc Employee Salary Hike
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Dabolim Airport
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com