Navelim : मुख्यमंत्री देवदर्शन योजनेअंतर्गत 1000 भाविक तिरुपतीला रवाना; अनेकांनी भुवया उंचावल्या

कृपा करा आणि ही योजना बंद करा
Navelim
NavelimDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा : मुख्यमंत्री देवदर्शन योजनेअंतर्गत आज नावेली मतदार संघातून तिरुपतीला 1000 भक्तगण रवाना झाले आहेत. अशी माहिती नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली. यात केपे व सांगे येथील भक्तगणांचा समावेश आहे. यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. कारण मडगाव येथील भाविकांना या यात्रेत अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यांनी समस्यांचा पाढाच वाचला होता. यातच आज 1000 भक्तगण रवाना होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

(1000 devotees from Goa left for Tirupati under Mukhyamantri Dev Darshan scheme)

मिळालेल्या माहितीनुसार आज 1000 भक्तगण मडगाव येथील रेल्वे स्थानकावरून रवाना झाले असून त्यांना निरोप देण्याच्या वेळी समाज कल्याण खात्याच्या संचालक संध्या कामत, समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पत्नी अल्का फळदेसाई, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, आदि. मान्यवर यावेळी उपस्थित होते. नावेली, केपे व सांगे मतदारसंघातून एकंदरीत 1000 च्या आसपास भक्तगण रवाना झाले असून पाच दिवसानंतर ते परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.

''कृपा करा आणि ही योजना बंद करा''

मुख्यमंत्री तिर्थयात्रा दर्शन या योजनेअंतर्गत नागरीकांना तीर्थ स्थळावर नेऊन यापुढेही आम्हा वृद्धांचे असेच हाल करणार असाल तर माझी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे कळकळीची विनंती आहे. ''कृपा करा आणि ही योजना बंद करा'', अशी प्रतिक्रिया तिरुपतीच्या प्रवासाहून परत आलेल्या मडगाव येथील भाविकांनी दिनांक 13 डिसेंबर रोजी व्यक्त केली आहे.

या नागरीकांनी एक दिवसांपुर्वीच आपला अनुभव सर्वांसमोर ठेवला असताना आज पुन्हा 000 च्या आसपास भक्तगण या योजनेअंतर्गत रवाना झाल्याने अनेकांनी आश्चर्याने भुवया उंचावल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com